श्रीगोंदा तालुक्यात शेलारांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार! राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, हज कमिटीचे माजी सदस्य लियाकत तांबोळी आणि मुकुंद सोनटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने श्रीगोंद्यातील राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या … Read more

श्रीगोंद्यातून पुन्हा एकदा घनश्याम शेलार पराभूत !

श्रीगोंद्यात घनश्याम शेलारांचे पक्षांतर अयशस्वी झाले आहे, श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांना निसटता विजय मिळाला. येथील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे घनशाम शेलार यांनी त्यांना तगडी लढत दिली. शिवसेनेकडून नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी मिळत नसल्याचे पाहून शेलारांनी चार-पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे हे पक्षांतर मात्र यशस्वी झाले नाही.  … Read more

हवेत असलेल्या पाचपुतेंना शेलारांनी घाम फोडला!

श्रीगोंदा – श्रीगोंदा मतदार संघात भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी  मोठी ओढाताण सुरू असल्याचे जिल्ह्याने पाहिले होते. या स्पधेत पाचपतेनी नागवडेंना मागे सोडत भाजपाचे तिकीट मिळवले होते.  उमेदवारी मिळवल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं.  कारण  लोकसभा निवडणुकीतही  या मतदार संघातून खा. डॉ. विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. डॉ. … Read more

माजीमंत्री पाचपुते यांच्याविरोधात अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी ?

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने उमेदवारीबाबतच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला. पाचपुते यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखत आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. शेलार यांच्या रूपाने भाजपत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. श्रीगोंदे-नगर … Read more