माजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना टोमणे

अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले यांनी खा.दिलीप गांधीना टोमणे मारले. माजी मंत्री पाचपुते यांनी साकळाईसाठी आपण कसे प्रयत्न केले, याचा पाढा वाचला. मागील सभेत खासदार गांधी यांनी डॉ. विखेंना मतदान करा एवढे म्हटले असते, तरी लोकांनी डोक्यावर घेतले … Read more

खा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावा !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खा. दिलीप गांधी यांना भाषण करण्यापासून रोखणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा बेरकीपणा याची देही याची डोळा ‘सर्वांनीच अनुभवला. प्रा. बेरड यांच्या या बेरकीपणामुळे खा. गांधी समर्थक चांगलेच भडकले आहेत. बेरडने गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष … Read more

2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले !

अहमदनगर :- मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही असं बोललं जात पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे. असं म्हणत खासदार गाधी संतापले. मोदींच्या सभेत व्यासपीठावर मोदींचं आगमन होण्याआधी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरु झालं. परंतु अचानक जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना … Read more

तिकीट कापले तरीही पक्षाचेच काम करणार – खा.दिलीप गांधी

अहमदनगर :- राजकारणामध्ये चढ – उतार चालू असतात. पक्षाने जरी मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही, माझे तिकीट कापले मात्र तरीही नाराज न होता, न थांबता पक्षाचेच काम करणार हे मी जाहीर केले आहे. पक्षविरोधी कृती करणे आमच्या रक्तात नाही. २००४ मध्येही पक्षाने माझे तिकीट कापले होते, तरीही पक्षाचेच काम केले, असे स्पष्टीकरण भाजपचे खासदार तथा … Read more

भाजपच्या व्यवस्थापन समितीतून खा. गांधीना वगळले!

नगर : भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी केली. या समितीतून खा. गांधी यांना वगळण्यात आले. संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी अभय आगरकर, प्रचार प्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी (कायदेशीर) अ‍ॅड.युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून नगर दक्षिण … Read more

पुत्र हट्टापुढे खासदार दिलीप गांधी हतबल…

अहमदनगर :- पुत्राच्या हट्टासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडे पुत्रहट्टापुढे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हतबल झाले आहेत. खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये … Read more

दिलीप गांधी सुजय विखेंचा प्रचार करणार ?

अहमदनगर : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. नगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. त्यानंतर आज स्वत: सुजय विखे पाटील यांनी … Read more

पुत्र कि पक्ष ? ना.विखे आणि खा. गांधींच्या पक्षनिष्ठेबाबत चर्चा !

अहमदनगर :- पुत्रप्रेमाला किती महत्त्व असते याचे उत्तम उदाहरण बुधवारी रात्री पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे यांनी रात्री उशिरा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. त्यांचे वडील … Read more

सुजय विखेंविरोधात सुवेंद्र गांधी ‘सुपरफास्ट’ !

अहमदनगर :- खा.दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करण्याची घोषणा केल्यानंतर मतदारसंघातील गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही झाले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर सुवेंद्र आजही ठाम आहेत. उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाच्या विखेंचे काम कसे करायचे अशा शब्दांत ते मतदारसंघातील … Read more

पुत्रप्रेमापोटी राधाकुष्ण विखे खा.दिलीप गांधींच्या भेटीला !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. खासदार दिलीप … Read more

पालकमंत्री शिंदे म्हणतात खा. दिलीप गांधी यांची चिंता तुम्ही करू नका

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधी यांची चिंता तुम्ही करू नका, दोन दिवसांत मी पाहून घेतो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंना आश्वस्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर येथे मंगळवारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात … Read more

सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार !

अहमदनगर :- नगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान आज खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजवर पक्षाशी … Read more

खासदार.दिलीप गांधी उद्या भूमिका जाहीर करणार.

नगर | विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी रविवारी (२४ मार्च) मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र हे सध्या ग्रामीण भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देण्यात मग्न आहेत. खासदार गांधी यांनी शेवटपर्यंत … Read more

सुजय विखेंच्या प्रवेशानंतर खा.दिलीप गांधी म्हणतात ….

अहमदनगर :- ‘डॉ. सुजय विखे यांचे भाजपमध्ये मी स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्ष संघटन वाढू शकते. पक्षाच्या धोरणानुसार पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, नगरच्या जनतेने तीन वेळा खासदार व एकदा मंत्री केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘नगरच्या जनतेच्या प्रेमाच्या ऋणातच मी … Read more

सुजय विखेंच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी अस्वस्थ !

अहमदनगर :- डॉ सुजय विखे यांचे संभाव्य भाजप प्रवेशाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असतानाच , खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनतर आता ते मुंबईत आले आहेत.   येत्या दोन दिवसांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिलं यादी जाहीर होणार आहे. या यादीत आपल्या नावाच्या समावेशासाठी खा . गांधी हे दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत … Read more

खा.दिलीप गांधींचा पत्ता कट सुजय विखे भाजपचे उमेदवार !

अहमदनगर :- खा.शरद पवार व ‘राष्ट्रवादी’ नगरची जागा काँग्रेसला सोडेना आणि ‘राष्ट्रवादी’मध्येही प्रवेश देईना. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच, असा चंग बांधलेल्या सुजय विखे यांनी अखेर भाजपातून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांचा भाजप प्रवेश होणार असून लोकसभेच्या उमेदवारीसह शिर्डी साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपदही सुजय विखेना मिळणार आहे.  गेले दोन … Read more

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नगरकरांना उड्डाणपूलाचे ‘गाजर’ !

अहमदनगर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात यापूर्वी तीन वेळा भूमिपूजन झालेल्या नगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा पुन्हा घाट घालण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी शुक्रवार (८ मार्च) चा मुहूर्त शोधला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती खासदार दिलीप … Read more

खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे !

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. देशात फक्त नरेंद्र मोदीच सर्वांचे उमेदवार आहेत. पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी मंगळवारी व्यक्त केला. दानवे यांनी सकाळी खासदार गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. खासदार गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. दानवे … Read more