कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत !

राहाता :- डोळ्यांसमोरून हक्काचे पाटपाणी वाहून जात आहे. कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत, असे प्रतिपादन माजी आ. अशोकराव काळे यांनी केले आहे. राहाता तालुक्यातील चितळी येथे माजी आमदार काळे यांनी नुकतीच स्नेहभेट देऊन येथील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर वाघ होते. … Read more

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा विरोधकांना इशारा

कोपरगाव :- सहकारातील पैशांचा वापर करून समाजात फूट पाडून आपला राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या नेत्यांनी वातावरण कलुषित करू नये, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पूर्णाकृती पुतळा १२-१३ वर्षांपासून शिल्पकाराच्या गोदामामध्ये तयार असताना काही नेत्यांनी श्रेयाचे गलिच्छ राजकारण करून पुतळ्याची एक प्रकारे अवहेलना … Read more

आता मिळणार सात दिवसांआड पाणी

कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे. तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील … Read more

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने हत्या !

कोपरगाव : तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणीच्या भावाने दाखल फिर्यादीनुसार आरोपी पतीच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा … Read more

विधानसभा निवडणुकीआधी अहमदनगर जिल्हा विभाजन करा अन्यथा….

राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्­नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष … Read more

गळफास घेत दोघांनी केली आत्महत्या

कोपरगाव :- शहरातील दोघांनी स्वतंत्र घटनांमध्ये आपल्या राहत्या घरी बुधवारी गळफास घेत आत्महत्या केली. गांधीनगर भागात इनडोअर गेम हॉलजवळ राहणाऱ्या नीलेश किसन दरंदले (वय ३७, महादेवनगर) यांनी राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला. शहरातील औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या किरण विजय चव्हाण (वय १३) या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. दोन्ही घटनांबाबत संतोष … Read more

मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणार्या नराधमास अटक

कोपरगाव : शहरातील मनोरुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : शहरातील ४२ वर्षीय मनोरूग्ण पिडीत महिलेवर मंगळवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी विनोद बन्सीलाल लोंगाणी याने … Read more

सामान्य जनतेला कांद्याच्या वांध्याचा फटका बसण्याची शक्यता

कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, येसगाव या परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे टाकळी फाटा येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला व मोठ्या प्रमाणात वाहून गेला. यामुळे कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी कांदा विक्री बंद ठेवली असल्यामुळे मंगळवार ते शनिवार असे चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांना मारले

कोपरगाव ;- तालुक्यातील पोहेगाव परिसरात राहणारे बाबासाहेब चंदर भोजणे, वय ४२, धंदा शेती यांना त्यांची मुलगी उषा संतोष वायकर, रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव तिच्या सासरच्या लोकांनी जमाव जमवून घरात घुसून बेदम मारहाण केली. या मारहाणीत बाबासाहेब भोजणे यांची आई, मुलगी उषा संपत वायकर, भाऊ सुखदेव चंदन भोजणे, कांताबाई सुखदेव भोजणे, सर्व रा. पोहेगाव हे जखमी … Read more

येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमय – डॉ.सुजय विखे

कोपरगाव : देशात आणि राज्यात भाजप महायुतीची लाट असून त्याचा प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाच भाजपमय करून सर्वच्या सर्व जागा भाजपा – सेना महायुतीच्या निवडून आणून बारा विरुद्ध शून्य असा इतिहास घडविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी … Read more

आशुतोष काळे आणि बिपीन कोल्हे यांच्या समर्थकांत धुमश्चक्री

कोपरगाव :- नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक ५ चे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार गायत्री कन्स्ट्रक्शनला देण्यासंदर्भात बोलवलेल्या बैठकीत आशुतोष काळे व बिपीन कोल्हे यांच्या समर्थकांत सोमवारी चांगली धुमश्चक्री झाली. प्रथम कोल्हे यांच्या उपस्थितीवरून व बैठक संपल्यानंतर टंचाई आढावा बैठक महत्त्वाची असल्याने प्रांत व तहसीलदारांनी तेथे उपस्थित रहावे म्हणून बिपीन कोल्हे यांनी सांगताच या बैठकीत निश्चित निर्णय … Read more

कोपरगाव मतदारसंघात खा. लोखंडे यांचे मताधिक्य का घटले ?

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांचे मागील लोकसभा निवडणुकीच्या मानाने मताधिक्य घटले असल्याचे पत्रक काढून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एकूणच कोपरगाव तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विजयाच्या जल्लोषात सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कट्टर अनुयायांना मात्र या गोष्टीचा विसर पडला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सन … Read more

गाडीला धक्का लागल्याचा राग,दोन गटांत तुफान दगडफेक, नगरसेवकासह ९ जणांना अटक

कोपरगाव :- धक्का लागल्याचा राग येऊन स्विफ्ट कारचालकाने मोटरसायकलस्वारास मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजता गांधीनगर भागात घडली. त्यानंतर दोन गट आमने-सामने येऊन प्रचंड धक्काबुक्की व दगडफेक झाली. लाकडी दांडक्याने व चाकूने वार करण्यात आले. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिस वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. शीघ्र कृतिदलाची एक तुकडी बोलवल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. … Read more

पिस्तूलचा धाक दाखवत पावणेसात लाख लांबवले

काेपरगाव | लोहकणेवस्ती येथील श्रद्धा होंडा शोरुमजवळून ज्युपिटर स्कूटरवरुन जाताना ३ ते ४ भामट्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकू व पिस्तूलचा धाक दाखवत साकुरी येथील राकेश वढेर (पटेल) यांच्या गाडीच्या डिकीत ठेवलेले पावणेसात लाख लांबवले. या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १८ मे रोजी दुपारी ४ दरम्यान घडली. राकेश … Read more

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेले

कोपरगाव | येथील संजीवनी कारखाना परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस आकाश सुदाम वाघ (सांगवी, जि. औरंगाबाद) याने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

कोपरगाव | खिर्डी गणेश शिवारात शेत गट नंबर ५४ मधील विहिरीत बाळासाहेब विठ्ठल शेटे (४५, बोलकी) यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी बसचालकास मारहाण

कोपरगाव :- पुणे-धुळे एसटी बस (एमएच १४ बीटी ३२९०) धुळ्याकडे जात असताना एकाने स्वीफ्ट डिझायर कार (एमएच १७ बीव्ही ९६९१) आडवी लावून माझ्या मावस बहिणीला सावळविहीर येथे का उतरवले नाही? असे म्हणत बसचालकास मारहाण व शिवीगाळ केली. नगर-मनमाड महामार्गावर तीनचारी येथे गुरूवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणास अटक

कोपरगाव :- दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ व्हॉटसअॅप ग्रूपवर अपलोड करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा व्हिडीओ आकाश नानाभाऊ खडांगळे (राहणार १०५ हनुमाननगर) याने ‘आकाशभाऊ खंडागळे युवा मंच’ या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकला. या प्रकरणी इमरान कालू कच्ची (वय २९) याने कोपरगाव शहर पोलिसांकडे तक्रार दिली. या … Read more