नगराध्यक्ष विजय वहाडणेंवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- नगरपालिकेचा पाणी पुरवठ्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने जून २०१६ ते जुलै २०१७ दरम्यान पाणी टंचाईच्या काळात बनावट वाहने दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून दोन लाख १० हजार १७८ रुपये उकळले. याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक रवींद्र नामदेव पाठक, तत्कालीन पाणी पुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे व ठेकेदार … Read more

देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा – आदित्य ठाकरे

कोपरगाव :- देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा. देशाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम निर्णय घेणारा हवा. त्यासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य आहेत. कारण ते कणखर नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदी व राहुल गांधींची तुलना होऊच शकत नाही. काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे, हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य … Read more

वीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी

कोपरगाव :- वीजचोरीप्रकरणी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांना सोमवारी १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. वाजे यांच्या समर्थ बर्फ कारखान्यात वीजचोरी होत असल्याचे आढळल्याने २१ लाख ६३ हजार रुपयांच्या बिलाची आकारणी करून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या कारखान्यावर मुंबईच्या वीज कंपनीच्या भरारी पथकाने छापा टाकला. मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार … Read more

कोणी किती माया गोळा केली हे जनतेसमोर आणणारच : नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव :- राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर कुणी किती माया गोळा केली, याची माहिती गोळा करून जनतेपर्यंत नेणार आहे. पक्ष शिस्तीच्या नावाखाली दडपशाही करणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम प्रामाणिक कार्यकर्ते करतील, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघ, जनसंघ व भाजपचा स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे … Read more

फरार सरपंचासह एक जणास अटक

कोपरगाव :- तालुक्यातील मोर्विस येथे महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करताना तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी ट्रॅक्टर पकडला. परंतु यातील आरोपी सरपंचासह तिघे जण फरार झाले होते, पैकी सरपंच एकनाथ चंद्रभान माळी व त्याचा सहकारी नीलेश गोरख वाघ यास कोंबिंग ऑपरेशन करून पकडण्यात कोपरगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी कामगार … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार !

कोपरगाव :- जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली. कोपरगाव शहर व तालुक्‍यातील नरेंद्र मोदी विचार मंच व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदींना … Read more

कंटेनर – दुचाकीच्या धडकेत महिला ठार.

काेपरगाव | नगर-मनमाड रस्त्यावर एमपी सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर कंटेनर व दुचाकीची धडक होऊन महिला ठार झाली. कावेरी विठ्ठल जाधव (२६, राहुरी) असे या महिलेचे नाव आहे. दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कावेरी जाधव या वडील व मुलगा सार्थक यांच्यासह मनमाड येथील लग्न समारंभ आटोपून राहुरी तालुक्यातील शेण … Read more

मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्ष सक्तमजुरी.

कोपरगाव :- मतिमंद मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचाराची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील माहेगा देशमुख व कुंभारी येथील आरोपी रमेश ऊर्फ पिन्या म्हसू जाधव व किरण ऊर्फ गोट्या भागवत कदम यांना २० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी सुनावली. २३ … Read more

शाळेत जातो असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परतल्याच नाहीत…

कोपरगाव :- शहरातील सुभाषनगर व दत्तनगर भागातील तीन अल्पवयीन मुली शाळेत जातो, असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परत आल्याच नाहीत. १ व २ मार्चला या घटना घडल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली पळून गेल्याचे समजते. सुभाषनगर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. हेड … Read more

अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी.

कोपरगाव :- लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपी आकाश रमेश रानशूर (कोपरगाव) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपी आकाश रानशूर याला पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शहरालगत असलेल्या सोनार वस्ती येथे राहणाऱ्या आकाश रमेश रमेश रानशूर याने आपल्या घरी धुणे-भांड्याचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन … Read more

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार.

कोपरगाव :- तुझे आई-वडील आंधळे आहेत. मी त्यांना सांभाळेन. तू माझ्याशी लग्न कर, असे आमिष दाखवून एका युवकाने १६ वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती झाली. या प्रकरणी पोलिसांनी आकाश रमेश रणशूर (सोनारवस्ती, मुर्शतपूर, धारणगाव रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीने फिर्याद दिली. आकाशने लग्नाचे आमिष दाखवून मुर्शतपूर फाटा … Read more

रेल्वेरूळावर मृतदेह आढळला.

कोपरगाव :- शहरातील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या सुनील बागले (वय ३८) यांचा मृतदेह २० फेब्रुवारीला तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रेल्वेरुळावर आढळून आला. कोपरगावचे रेल्वेस्टेशन मास्टर विजयपाल सिंग यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बागलेचे नातेवाईक, मित्र परिवाराने तेथे मोठी गर्दी केली होती.

हार्वेस्टींग मशिनखाली चिरडून एक ठार.

कोपरगाव :- तालुक्यातील भोजडे शिवारातील स्वत:च्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस हार्वेस्टिंग मशीनच्या चाकाखाली चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला. राधाकृष्ण निवृत्ती सिनगर (वय ४९ रा.भोजडे, ता.कोपरगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हा अपघात मृत सिनगर यांच्या शेतात घडला. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना यांच्या ऊस हार्वेस्टिंग मशीन मार्फत सिनगर … Read more

पाण्याचे बाटलीचे पैसे मागितल्याने नगरसेवकाने दुकान जाळले.

कोपरगाव :- पाण्याच्या बाटलीचे असलेली उधारी मागितल्याचा राग आल्याने नगरसेवकासह तिघांनी साईआस हे मेडिकल दुकान फेटवून दिल्याची घटना १४ फेब्रुवारी रोत्री रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान टाकळी रोडवर घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी : टाकळी रोडवर सचिन निबा शिरोडे यांचे साईआस नावाने मेडिकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी … Read more

भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील चार तरुण ठार.

अहमदनगर :- नाशिक महामार्गावर शुक्रवारी ( दि . २५ ) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात बाबा ढाब्यासमोरील वळणावर एसटी बस व मारूती आय २० कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चारही युवक जागीच ठार झाले. अपघतानंतर बसने पेट घेतल्याने तीच्यातील १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शिर्डी – … Read more

राहत्या घरात गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या.

कोपरगाव :- शहरातील मोहिनीराज नगर भागात रविवारी (दि. २०) रोजी सायंकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात राहणाऱ्या सचिन सर्जेराव सुपेकर (वय २३) व्यवसाय पेंटिंग काम करणाऱ्या तरुणाने रविवारी (दि.२०) सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घरातील किरकोळ भांडणावरून राहत्या … Read more

वृद्धेचे मंगळसूत्र बसस्थानकात लांबवले.

कोपरगाव :- बसस्थानकात उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्याने लांबवले. ही घटना शनिवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. मुंबई-घाटकोपर येथून आलेल्या वैशाली शांताराम हिरे (६० रा.घाटकोपर) या कोपरगाव बसस्थानकावर शिर्डी येथे जाण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले. मंगळसूत्र चोरल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला पंरतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. … Read more

कार-बसच्या अपघातात दोन ठार.

कोपरगाव :- डस्टर कार व बसचा समोरासमोर अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर झाले. ही घटना तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. चालक प्रमोद भाऊसाहेब भांबरे (२५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) व गणेश नामदेव डांगे (२६, रा. हल्ली मुक्काम पुणे) अशी मृतांची नावे आहे. नितीन रामनाथ डांगे … Read more