मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली आहे. याच पार्शवभूमीवर राज्यामध्ये लॉकडाऊन होणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील दोन महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली हे दोन जिल्हे आहे. … Read more

नाकाबंदीमध्ये पालिका कर्मचार्‍याला मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  कोविड सेंटरमधून कर्तव्य बजावल्यानंतर घरी परतणार्‍या कोपरगाव पालिकेच्या कर्मचार्‍याला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान गाडी अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करुन संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने मंगळवारी तहसीलदारांना दिले आहे. तहसीलदार योगेश चंद्रे … Read more

बिग ब्रेकिंग : आयपीएल 2021 रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची … Read more

एक हाक मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी… एकदंत गणेश मंदिराच्या वतीने सामाजिक उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल-मे महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते, पण ती पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात 5 मे पासून 14 मे … Read more

लसीकरणाचा फज्जा ! नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरात महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ पहायला मिळाला. सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण बंद करून कर्मचारी निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना अनेक तास उन्हात ताटकळत थांबावे लागले. लसीकरण पुन्हा सुरू होणार की नाही हे निश्चित सांगितले जात नसल्याने … Read more

लसीचे डोस मिळण्यासाठी प्रयत्नशील : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेला १० हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ … Read more

‘या’ आमदारांकडून ऑक्सिजन बेडचा प्रश्न निकाली, १०० बेडचे कोविड सेंटर सुरू !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे देशभरासह राज्यात तांडव सुरू आहे याला अहमदनगर जिल्हा व कोपरगाव विधानसभा मतदार संघ देखील अपवाद नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रूप हे अतिशय रूद्र असून कोविडचे लक्षण आढळून आल्यानंतर त्याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी बाधित रुग्णांना आपला जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत होती … Read more

शहरातील ‘या’ रुग्णालयांना मिळाल्या ऑक्सीजन निर्मिती मशीनसह व्हेंटिलेटर

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरचा सातत्याने तुटवडा भासतो आहे. यातच दानशुर व्यक्तींकडून जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटलला 10 ऑक्सीजन तयार करणाऱ्या मशीन व 4 व्हेंटिलेटर मशीन देण्यात आल्या आहेत. देशासह जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट भयानक आहे, जिल्ह्यात कोरोनाचे अतिदक्ष रुग्ण मोठ्या प्रमाणात … Read more

चिंताजनक : अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार जणांचा घेतला कोरोनाने बळी

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ इतकी झाली आहे. दरम्यान मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांचे मृत्यू वाढतच असून वर्षभरात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त मृत्यू … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले…प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडीसीवर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दाना बाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्तीतजास्त … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असुन गेल्या चोविस तासांत जिल्ह्यात तब्बल 3822 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संगमनेरमध्ये 566, तर राहाता तालुक्यात 259 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नगर शहरात 547 रुग्ण आहेत. अहमदनगर : 547, राहाता : 259, … Read more

मोठा दिलासा: आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली ; जाणून घ्या नवीन डेडलाईन

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-  आपण जर आर्थिक वर्ष 2019-20 चे रिटर्न्स भरण्यास अजून राहिले असल्यास किंवा चुकले असल्यास अद्याप आपल्याकडे वेळ आहे. केंद्र सरकारने आज ( शनिवारी 1 मे रोजी ) अनेक आयकर कंपन्यांची अंतिम मुदत 31 मे पर्यंत वाढविली असून यामध्ये आर्थिक वर्ष 2019-20 साठी रिटर्न भरणे किंवा त्यात बदल करणे … Read more

१०२ वर्षीय आजीबाईची कोरोनावर यशस्वी मात !

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-  ब्राह्मणी येथील १०२ वर्षीय आजीबाई सखुबाई गंगाधर हापसे यांनी कोरोनावर मात केली.जिल्ह्यासह देशभर कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. व्यवस्था कोलमडली.प्रशासन अन् आरोग्य विभाग हतबल झाले. गावोगावी मृत्यू तांडव सुरू आहे. अशा परिस्थितीत १०२ वर्षीय आजीबाईंनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. आनंदाची बातमी ब्राह्मणीकरांसह जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे.आजीबाई सखुबाई गंगाधर हापसे … Read more

आज ३७५३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२१९ बाधितांची रुग्ण संख्येत भर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६६ टक्के

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ५५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू वाढले

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-संगमनेरमध्ये शुक्रवारी ३४९ बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णसंख्या १५,१७५ झाली. १८०३ रुग्णांवर सध्या उपचार सुुरू आहेत. १३,२८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ८३ जणांचा बळी कोरोनाने घेतला. व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडअभावी अनेकांनी प्राण सोडला. अन्य तालुक्यांतील अनेक रुग्ण संगमनेरात उपचार घेत आहे. घुलेवाडीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात ६० ऑक्सिजन बेड … Read more

लोक घरात तडफडून मरताहेत !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये तपासणी किट नसल्याने व ऑक्सिजनसह आरोग्य सुविधाची कमतरता असल्याने लोक तडफडून घरी मरत आहेत, अशा शब्दात माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आम्ही घेतलेल्या बैठकांमधील कोणतेही गोष्टीची पूर्तता झालेली नसल्याने बैठकीला काहीच अर्थ राहिलेला नाही, … Read more

मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली : आमदार विखे

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी मंत्री आणि विभागाकडून झाली ? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. आमदार विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसऱ्या लॉकडाऊनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या मागील घोषणेनंतरही … Read more