लसीचे डोस मिळण्यासाठी प्रयत्नशील : आमदार जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेला १० हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला आहे.

लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आमदार जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे. आयुक्त शंकर गोरे म्हणाले, महानगरपालिकेला शासनाकडून १० हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे.

शहरात पाच लसीकरण केंद्रावर दररोज दीड हजार लसीकरणाचे डोस दिले जाणार आहेत. यासाठी आरोग्य सेतू ॲप वर नोंदणी करणे बंधनकारक अाहे, असे ते म्हणाले. आमदार जगताप यांच्या उपस्थितीत १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवतीला लसीकरणाचा डोस देऊन शुभारंभ झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|