अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 487 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

मेहेरबाबा ट्रस्ट महार वतनाची जागा बळकावत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अरणगाव येथील मागासवर्गीय समाज व अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मध्ये 72 एकर जागेचा वाद निर्माण झाला असताना सदर जागा महार वतनाखाली मिळाली असून, ट्रस्टच्या वतीने बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागासवर्गीय समाजाला पोलीसांच्या नावाने धमकावले जात असताना या भागातील मागासवर्गीय समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ … Read more

संपूर्ण रस्त्याच्या परिसरावर एमआयडीसी कंपनीतले विषारी कचऱ्याचे साम्राज्य

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडिसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आल्या आहे. त्यामुळे येथून जाणारया व येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील गुरव … Read more

आरपीआयच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत गाव तेथे शाखा स्थापन करण्याच्या निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये आरपीआयचे भिंगार शहराध्यक्ष अमित काळे यांची युवक जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. आरपीआयच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत गाव तेथे आरपीआयची शाखा सुरु करणे, पक्षाची सभासद नोंदणी, … Read more

जिल्ह्यातील ह्या गावांमध्ये पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- ज्यातील कोरोना मुक्त झालेल्या गावांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत ५ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यात काही तृटी असल्याचे कारण देत काही तासातच तो संकेतस्थळावरून हटवला होता. मात्र, बुधवारी, ७ रोजी पुन्हा नव्या मार्गदर्शक तत्वांसह नवा शासन निर्णय जाहीर झाल्याने … Read more

नगर तालुक्यातील ‘त्या’ गावात लसीकरणावरून गोंधळ!

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-    नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे लसीकरण मोहीम सुरू असताना मोठा गोंधळ उडाल्याने काही वेळ लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बहिरवाडी येथे लसीकरण कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. १४० डोस असलेल्या लसीकरण कॅम्प च्या दरम्यान बहिरवाडी ग्रामस्थ व … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले माझ्या चांगुलपणाचा फायदा आता घेवु नका अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जुलै २०२१ अखेर शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करा. आता लोकभावनेचा अंत पाहु नका असा इशारा  खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. पाथर्डी येथील शासकिय विश्रामगृहामधे बुधवारी आयोजित आढावा बैठकीत विखे बोलत होते. यावेळी शहरातील महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. खोदलेल्या खड्यात अनेकजण पडुन अपघात होत आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते निलंबित पाेलिस पुन्हा सेवेत

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- तत्कालिन अपर पाेलिस अधीक्षक दत्ताराम राठाेड यांच्या पथकातील निलंबित केलेल्या पाेलिसांना पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देण्यात अाली अाहे. बनावट डिझेल प्रकरणात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यास विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पथकातील एका पाेलिस अधिकार्यासह ७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. तसेच इतर कारणातून निलंबित ३ कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा … Read more

एकाच रात्रीत २ दुकाने, मंदिरातील दानपेटीची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राहुरी बाजारपेठेतील २ दुकाने फोडून गणपती मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याने राहुरी शहरात खळबळ उडाली. चोरी करणाऱ्या दोघांची छबी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शहरातील नवीपेठेत मध्यरात्रीच्या वेळात एकाच रात्री चोरीच्या ३ घटना घडल्याने सराईत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले. नवीपेठेतील वर्धमान या कापड दुकानचा पाठीमागील बाजूचा … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेमध्ये थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन ! अहमदनगर बद्दल…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-   जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.पत्रकार परिषद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आला. माईकचा आवाज बंद करून त्याना पवारांशी बोलाव लागले. फोन ठेवल्यानंतर ते म्हणाले उपमुख्यमंत्र्यांचा फोन होता. नगरबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या, असे त्यांनी सांगितले. मात्र पत्रकार परिषदेत … Read more

म्हणून ‘त्याने’ चालत्या वाहनातून उडी घेतली अन…?

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यास परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना तो आरोपी चालत्या गाडीचे दार उघडून पळून गेला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या बाबत सविस्तर असे की, कोळगाव शिवारातील कन्हेरमळा या ठिकाणी किरण संजय गायकवाड यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री … Read more

आता हेच राहील होत ? ! CNG च्या दरातही झालीय वाढ; आजपासून नवे दर…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अलीकडे पेट्रोलने 100 रूपयांचा आकडा पार केला. डिझेलच्या दरांत देखील सतत वाढ होत आहे. इंधनांच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत , शिवाय महिन्याचं गणित देखील बिघडलं आहे. आता त्यामध्ये अधिक भर पडणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि LPG सिलेंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरांत वाढ करण्यात आली आहे … Read more

लस घेवूनही फायदा नाही ? अँटीबॉडीजचा नाश करतोय डेल्टा व्हेरिएंट

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  लसीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंट नाश करीत असल्याचे समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनात (आयसीएमार) असे आढळले की कोविशिल्ड लस घेणाऱ्यांना डेल्टा व्हेरिएंटची लागण होत आहे तर त्यापैकी काही जणांची अँटीबॉडी कमकुवत होत आहेत. त्यामुळेच तज्ज्ञांनी लसीच्या तिसल्या डोसचा सल्ला दिला आहे. 614 जी … Read more

पावसाचे पुनरागमन … राज्यातील या भागांत मुसळधार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अनुकूल स्थितीअभावी गेल्या १९ दिवसांपासून वायव्य भारताच्या सीमेवर रखडलेला मान्सून गुरुवारपासून (दि. ८ जुलै) सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली आहे. राज्यात दि. ८ ते ११ जुलैदरम्यान पावसाची … Read more

१२ वर्षांपुर्वी मेलेला मुलगा गावात पोहचतो तेव्हा… श्रीगोंदा तालुक्यातील त्या तरुणांमध्ये देव दिसला..

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  साधारणत: २/३ वर्षापूर्वी एक भिखारी घोटवी ता. श्रीगोंदा येथील शेतकरी शंकरकाका बारगुजे यांच्या पाण्याच्या टाकीवर पाणी पिण्यास थांबला, आणि तेथेच बसून राहिला त्यांचा मुलगा निलेश याने त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो काय बोलतोय हे काहीच कळत नव्हते. त्याच्या अवस्थेवरून तो भुकेला आहे हे जाणवत होते. त्यांनी त्याला … Read more

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  येथील आरोग्य उपकेंद्रातच डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनिल भिंगारे यांनी केली. काल मंगळवार दि.6 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास … Read more

बायपासवरील परप्रांतीयांची ‘ती’ दुकाने बंद करा अन्यथा …!       

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडीसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आले आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काही एमायडीसीत असलेल्या विविध कंपन्यांमधील विषारी व वेस्टेज कचरा निंबळक बायपास जवळील मोकळ्या जागेत … Read more

अरे बापरे! :या’ तालुक्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  राज्यात सुगंधी तंबाखू, गुटखा आदीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील अनेकजण छुप्या मार्गाने गुटखा विक्री करतात. नुकतीच नगरमध्ये पोलिसांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. यानंतर आता श्रीगोंदा पोलिसांनी तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील एका किराणा दुकानात श्रीगोंदा पोलिस उपनिरिक्षक रणजित गट आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून … Read more