शहरातील पाणीपुरवठा चार दिवस विस्कळीत होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या महिन्याभरात नागरकरांवर अनेकदा पाणी संकट ओढावले आहे. आता पुन्हा एकदा शहर पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे 19 ते 22 जूनपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती, महापालिका प्रशासनाने दिली. नेमके कसे असणार आहे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ? जाणून घ्या बोल्हेगाव, नागापूर, सावेडी … Read more

तर मंत्र्याची डोकी फोडल्याशिवाय या शेतकर्‍यांची पोरं स्वस्त बसणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी दूध उत्पादकांनी मंगळापूर दूध संकलन केंद्रासमोर रस्त्याच्या कडेला सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन केले. दूधाचे भाव पडले तरी सरकार हस्तक्षेप करत नाही, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केले गेले तर आगामी काळात दूध उत्पादक शेतकरी … Read more

व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या दाम्पत्याने मालकाला लाखोंना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिस घर मे खाया पिया उसी मे छेद… या म्हणीला साजेसे अशीच एका घटना नगर शहरात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरातील एका व्यवसायिकाकडे कामगार म्हणून असणार्‍या पती- पत्नीने घरातून अडीच वर्षामध्ये सहा लाख 37 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. दरम्यान या दाम्पत्याविरुद्ध … Read more

गोंधळ टाळण्यासाठी आता घरोघरी होणार लसीकरण…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय राज्य कृती दलाने घेतला आहे. एकीकडे केंद्र सरकार लसींचा पुरेसा पुरवठा करत नसतानाच १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यामुळे राज्यांपुढे लसीकरण नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४५ वयापुढील … Read more

CBSE बोर्डाच्या दहावीचा 20 जुलैला, तर बारावीचा 21 जुलैला निकाल

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला, तर बारावीच्या परीक्षेचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर करणार असल्याची घोषणा CBSE बोर्डाने केली. CBSE ने गुरुवारीच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र जाहीर केले. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. CBSE बोर्डाचे संयम भारद्वाज म्हणाले, दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल … Read more

सभामंडपासाठी आ. पाचपुतेंच्या निधीतून १० लाखांचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील श्रीराम मंदिरातील सद्गुरू (स्व.) महेंद्रनाथजी महाराज यांच्या समाधीस्थळासमोरील सभामंडपासाठी श्रीगोंद्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. तशा प्रकारचे पत्र त्यांनी नाथसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच आता या सभामंडपाचे काम मार्गी लागणार आहे. स्व. महेंद्रनाथजी … Read more

ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार प्रकरणी ‘त्या’ दोघांवर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडल्या. यात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी लगेचच पसार झाले. मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता चव्हाण घोडेगावातून घरी चालले होते. … Read more

आमदार लंके म्हणतात भाषणे ठोकण्यापेक्षा विकासकामांवर…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- परिषद किंवा १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन तीन लाख रुपयांची कामे मंजूर करून आणायची, लाख रुपयांच्या विकास कामाच्या नावाखाली हातभर भाषणे ठोकायची, हे काम विरोधक करत आहेत, त्यामुळे विकासाच्या नावाखाली मोठमोठी भाषणे ठोकणारांची संख्या तालुक्यात वाढली असून, भाषणे ठोकण्यापेक्षा आपला विकास कामांवर भर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

जे एका मंत्र्याला जमले नाही, ते काम वर्षभरात आ. रोहित पवार यांनी करुन दाखवले !

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जगात दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडे बघितले जाते. आज त्याठिकाणी विश्वस्त मंडळ स्थापन करताना प्रामुख्याने साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विकासाचा सुक्ष्म दृष्टीकोन असणारीच व्यक्ती नेमावी, राज्यात अनेक तरुण नेतृत्व आहेत, त्यात महाविकास आघाडीतदेखील अनेक चांगले आणि कर्तबगार नेते असून कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच विकासाची … Read more

साईमंदिरासमोर गार्डन विकसित होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आणि नगरसेवकांच्या पुढाकारातून साईमंदिरासमोर असलेल्या नगर-मनमाड रोडलगतच्या त्रिकोणातील मोकळ्या जागेत भव्य असा बगिचा, लहान मुलांना गार्डन आणि भव्य अशी कोरीव व अप्रतीम साईबाबांची मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डीच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती … Read more

एकाच पावसात रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाचे काम ठेकेदारामुळे रेंगाळल्याने मार्गाच्या ठिकाणी एकाच पाऊसात पाणी साठले आहे. सदर ठिकाणी त्वरित पाणी निचरा होण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम पूर्ण नसताना २७ एप्रिल २०२१ पासून कायमस्वरूपी रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय रेल्वे … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- गेल्या पाच वर्षांत शिर्डीत रोज विश्वस्त मंडळ जाहीर होत आहे. त्याबाबत याद्याही जाहीर होत आहेत; मात्र महाआघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते विश्वस्त मंडळ जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानवर लवकरच विश्वस्त मंडळ येणार, अशी चर्चा जोरदारपणे … Read more

युवकाच्या निधनानंतर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलीस ठाण्यासमोर नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या ग्रामस्थांनी ठिय्या अंदोलन केले. यानंतर पोलिसांनी संबंधित विहीरमालकांवर गुन्हा दाखल केला. घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचे शेत आहे. विहिरीतील मोटार काढण्यासाठी शिवाजी … Read more

वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस दल आणि … Read more

वारकऱ्यांना पायी दिंडीस परवानगी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शासनाने वारकऱ्यांना पायी दिंडी परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी जिल्हाध्यक्ष रामकिसन महाराज तापडिया यांच्यासह संत मंडळींनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनास वेळोवेळी मंदिर, भजन, कीर्तन, कार्यक्रम आदींवर शासकीय बंदी ठेवून त्यास सहकार्य केले असताना आता लॉकडाऊन उघडूनदेखील पायी दिंडीस परवानगी नाकारल्यानेे वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत … Read more

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होय,आम्ही सर्टिफाईड गुंड…

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यानंतर मोठा राडा झाला. या प्रकरणी माहीम पोलीस स्थानका गुन्हा देखील दाखल … Read more

दीड वर्षापासून बंद असलेल्या भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची दुरावस्था

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दीड वर्षानंतर सुरु झालेल्या भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये मोठी दुरावस्था निर्माण झाली असताना तातडीने या जॉगिंग पार्कची स्वच्छता करुन, सर्व सोयी सुविधा पुरविण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन … Read more

कोरोना काळात मुख्यालयी न थांबणार्‍या अधिकारी, कर्मचारींवर कारवाई होण्यासाठी उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाच्या संकटात नेमणुक असलेल्या मुख्यालयी उपस्थित न राहणार्‍या नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल लोकेशन तपासून यामध्ये दोषी आढळणार्‍यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले. तर या तक्रारीवर कार्यवाही होत नसेल तर जिवंतपणीच शरीर दान घेऊन … Read more