इमामपूर घाटात मृतदेह आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत एका अज्ञात महिलेचा आज सकाळी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी मृतदेह आढळून आलेल्या महिलेची ओळख पटविली असून नगर शहरातील पाईपलाईन रोड येथील वंदना रेपाळे असल्याचे पोलिसांनी सांगीतले असून त्या धनगरवाडी येथे शिक्षिका होत्या. वंदना रेपाळे या गेल्या चार दिवसापासून घरातून … Read more

स्मरणात राहील असा विकास करून दाखवणार : आ. आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- लोकप्रितिनिधी येतात व जातात. मात्र कोणत्या लोक प्रतिनिधींनी कोणती कामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदारसंघातील जनतेने ज्या ज्या वेळी सेवा करण्याची संधी दिली, त्या त्यावेळी मतदारसंघाचा विकास झाला. हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील, असा मतदारसंघाचा विकास करून दाखवणार आहे, असे प्रतिपादन आमदार … Read more

मतिमंद युवकाला विनाकारण मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  खासगी गाडीतून सध्या वेशात आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी येथील चिकन दुकानदार व मतिमंद युवकाला विनाकारण मारहाण केल्यामुळे संतापलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगला चोप दिला काल संध्याकाळी नगरपालिका कार्यालयाच्या मागील बाजूस छापा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या कर्मचाऱ्यांनी एका मतिमंद मुलास काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली हा … Read more

सिंधुताई विखे पाटील गृहप्रकल्‍पाचे उद्या लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  मागेल त्‍याला हक्‍काचे घर या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या संकल्‍पनेला लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने प्रत्‍यक्ष कृतीत उतरवून ६० कुटूंबियांना आहे त्‍याच जागेवर हक्‍काच्‍या घराचा आधार मिळवून दिला आहे. भाजप नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली साकार झालेला सिंधूताई विखे पाटील निवा-याचा पथदर्शी गृहप्रकल्‍प देशापुढे ग्रामीण विकासाचा अनोखा उपक्रम ठरला … Read more

अहमदनगर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पावसाळ्या निमित्त 450 छत्र्यांचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- सचिन भाऊ मित्र मंडळाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहरातील सर्व पोलिसांना पावसाळा निमित्त छत्र्या वाटप करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक विषाल ढूमे यांच्याकडे देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रा माणिक विधाते, राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे समवेत सागर गारुडकर, वैभव जगताप, प्रसाद कपिले, … Read more

फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने 213 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  दीन, दुबळ्यांना आधार देण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशनने केले. अनेक दृष्टीहिनांना नवदृष्टी देण्याचे काम शिबीराच्या माध्यमातून करुन वंचितांच्या जीवन प्रकाशमय केले. आपल्या कार्यालयातील एक कर्मचारी हिमालयाच्या उंचीचे सामाजिक कार्य उभे करतो हे पाहून अभिमान वाटत असल्याची भावना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजी. गणेश नान्नोर यांनी व्यक्त केली. तर फिनिक्स … Read more

कठिण काळात शहराचे पालकत्व स्विकारुन आमदार जगताप यांनी सर्वपरीने योगदान दिले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार देऊन अनेक गरजू घटकातील कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार, औषधे व ऑक्सिजन बेड मिळवून दिल्याबद्दल चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने त्यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव करण्यात आला. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय … Read more

घर घर लंगर सेवेच्या ऑक्सिजन सेवेत बारा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य व वंचित घटकांना आधार देण्याची संकल्पना घर घर लंगर सेवेने कृतीत उतरवली. मागील वर्षापासून गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. अन्नदान पर्यंत न थांबता सर्वसामान्यांची गरज ओळखून त्यांना सेवा पुरविण्याचे केले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांसाठी अत्यावश्यक बनलेल्या ऑक्सिजनची निशुल्क सेवा लंगर सेवेने … Read more

आमदार जगताप यांना मंत्रीपद देण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. तर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांना मंत्रीपद देण्याची एकमुखी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, … Read more

अखेर साई संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेला मुहूर्त सापडला! ‘ हे’ आहेत विश्वस्त पदासाठी इच्छुक

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थांनमध्ये विश्वस्थ मंडळ कधी होणार ? ह्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून मंगळवार २२ जून रोजी शिर्डी साई संस्थानचे अधिकृत विश्वस्थ मंडळ स्थापन होणार असून त्याची अधिकृत यादीची घोषणा त्याच दिवशी राज्य सरकार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अतिशय महत्वाच आणि मानाचं … Read more

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील गजानन कॉलनी या भागात राहणार्या १८ वर्षे वयाच्या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरी अभ्यासाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 57/2021 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री.संजय … Read more

३ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीसी, अंबिलवाडी, मठ पिंपरी, हातवळण, गुणवडी, राळेगण, गुंडेगाव, वाळकी, देऊळगाव, सारोळा, खोस्पुरी, हिवरे झरे, खडकी, बाबुर्डी इत्यादी गावांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रुई छत्तिशी येथे वृक्षारोपण करताना आमदार संग्राम जगताप समवेत दादासाहेब दरेकर, गजानन भांडवलकर, संतोष मस्के, अभिलाष गिघे, रमेश भामरे, … Read more

एमआयडीसी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास, सॅनिटायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- सावता परिषद अहमदनगर शहर आणि जिल्हाच्या वतीने अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एमआयडीसी येथे काम करणाऱ्या कामगार यांना मास्क, सैनी टायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप करतांना सावता परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर, अहमदनगर शहर अध्यक्ष नितीन … Read more

“प्रवरेचादेवयोगी”नामदार श्री. राधाकृष्णजीविखे पाटील साहेब

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  आज दि. 15 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री व शिर्डी विधानसभा मतदार संघाचे सन 1994 पासून आजपावेतो सलग प्रतिनिधित्व करणारे विकासाचे अग्रदूत सन्मा. आमदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रात आजपर्यंत आपण अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली घराणी पाहिली आहेत परंतु विकासाच्या व … Read more

पोलीस नाईक सानप लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  वाळूच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यातील (ता.राहाता) पोलीस नाईक २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील तक्रारदाराच्या वाळूच्या वाहनावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक भाऊसाहेब संपत … Read more

अकोले तालुक्यात नेटवर्क नसल्याने पुलाखाली ऑनलाइन भरते शाळा

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपसंडी गावातील तेरा वर्षांच्या तुषार मुठेची गावात मोबाइल नेटवर्क नाही. त्यामुळे गावापासून आठ किलोमीटर दूर असलेल्या पुलाखाली दररोज तुषार मुळे या विद्यार्थ्याची ऑनलाइन शाळा भरते. परिसरात हिंस्त्र जनावरे असल्याने येथे पालकांना पहारा द्यावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. हे … Read more

धक्कादायक : ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर कोरोनाच्या सातपट जास्त

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच आता ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर कोरोनाच्या सातपट जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच ‘म्युकरमायकोसिस’ला रोखण्याचेही आव्हान प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. सातारा जिल्ह्यात आजवर म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या रूग्णांची १२२ वर पोहोचली आहे. त्यातील ६८ जण उपचाराधिन असून या आजाराने १९ … Read more

साईबाबा संस्थांनवर राजकीय व्यक्तीची नियुक्ती नको

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी अनेक वेळा राजकीय व्यक्तींची नेमणूक झाली आहे. त्यात अनेक गैरप्रकार व आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्याने या संस्थानची बदनामी झाली आहे. यामुळे साई संस्थानवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी … Read more