अहमदनगर शहरातील ह्या सिग्नलला चपलांचा हार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-वाहतूक सुरक्षा सप्ताहातही सिग्नल बंद असल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचातर्फे आंदोलन करण्यात आले. सक्कर चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार घालण्यात आला. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी स्वत: शिडीवर चढून सिग्नलला चपलांचा हार घातला. त्यावर निषेधाचा फलक लावला. मंचाचे प्रमुख सदस्य यावेळी उपस्थित होते. वाहतूक सुरक्षा अभियान सुरू असताना … Read more

खड्डे समस्या सोडविण्यासाठी मनपा सरसावली; नागरिकांना दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-शहरातील काही भागात रस्त्याचे काम सुरू आहे. डांबरीकरण, पॅचिंगचे कामे केली जात आहेत. ही कामे सुरू असतानाच स्थानिक नागरिक डांबरीकरणारवर पाणी सोडतात. व्यवसाय करणारे देखील पाणी टाकून रस्ता साफ करतात. परंतु रस्त्यावर पाणी टाकणे हे योग्य नाही. पाण्यामुळे डांबर आणि खडी वेगवेगळे होता. मात्र आता रस्त्यावर पाणी सोडल्यास संबंधितांवर … Read more

महिला कर्मचाऱ्यानी तक्रार केलेल्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची उचलबांगडी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर चौकशी करून महिला तक्रार निवार समितीने मनपा कर्मचारी मेहेर लहारे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वतंत्र सहायक आयुक्त सचिन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लहारे यांच्याबाबत मध्यंतरी काही महिला कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. दैनंदिन काम करत असताना लहारे महिला कर्मचार्‍यांकडून अपेक्षा … Read more

मनपा प्रभारी आयुक्तांचा पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविला

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. या रिक्त पदाचा कार्यभार पुढील आदेश होइपर्यंत जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडेच राहाणार असल्याचे नगरविकास खात्याच्या सचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. मायकलवार यांनी मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यामुळे नगर … Read more

महापालिका स्थायी समिती सभापती करणार उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- महापालिकेच्या विद्युत विभागाला विभाग प्रमुखच नसल्यामुळे शहरातील पथदिव्यांसाठीचा स्मार्ट एलईडी प्रकल्प गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. ठिकठिकाणी पथदिवे बंद आहेत. नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला पदाधिकारी व नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. पथदिवे सुरु नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत येत नसल्याने नगरसेवक … Read more

संपात सहभागी झाल्याने दिवसभर मनपाचे काम बंदच

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. याच नवीन कामगार कायद्याविरोधात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. या देशव्यापी संपात महापालिकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने झाडूकामासह अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज गुरूवारी दिवसभर ठप्प होते. युनियनने मनपात कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भूमिका हि मांडली होती. महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी कामगार … Read more

मनपा पतसंस्थेच्या सभासदांची कुठलीही फसवणूक नाही

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- महापालिका कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वस्तूरुपी कर्जवाटप केले असता आमच्या सभासदांची यामध्ये कुठलीही फसवणूक झाली नसून हे वस्तुरुपी कर्ज नियमानुसार आम्ही संस्थेकडून घेतलेले आहे. मनपा कर्मचारी पतसंस्था ही आमच्या सभासदांची कामधेनू आहे. आम्ही आमच्या अडचणीच्या काळामध्ये मुला-मुलींचे लग्न, आजारपण तसेच शिक्षणासाठी लागणारा खर्च कर्जरुपी पतसंस्थेकडून घेऊन आमच आर्थिक उन्नती … Read more

कॉग्रेस शहर जिल्‍हाध्‍यक्ष मयुर पाटोळे यांची महापौर वाकळे यांच्‍यावर टिका करण्‍याची लायकी नाही !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-नगर शहरासह जिल्‍हयामध्‍ये कोवीड रूग्‍णांची संख्‍या दिवसें दिवस वाढत आहे. शहरामध्‍ये देखील रूग्‍ण संख्‍या वाढत असल्‍यामुळे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी कोवीड रूग्‍णांवर उपचार होण्‍यासाठी तीन ठिकाणी कोवीड सेंटर सुरू केले. या ठिकाणी रूग्‍णांना चहापाणी, नाष्‍टा, दोन वेळेस जेवण आदी सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. या ठिकाणी करण्‍यात येणा-या उपचारामुळे … Read more

आजपासून अहमदनगर महापालिकेची कार्यालये उघडणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- महापालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू केल्यामुळे मनपाची कार्यालये अघोषित बंद होती. सोमवारपासून ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार राहून कामकाज करणार आहेत, परंतु नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद नसेल, असे कामगार युनियनने स्पष्ट केले. मनपाचे ४० ते ५० कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची … Read more

महापालिकेच्या `बड्या` अधिकाऱ्याच्या दालनात कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-   नगर शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणारे कोरोनायोध्येही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. आयुक्तांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उपचारासाठी कोरोना उपचार केंद्रात दाखल केले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना … Read more

अहमदनगर महानगरपालिकेतील आणखी सहा कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-  अहमदनगर महानगरपालिकेलीत आणखी सहा कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.धक्कादायक म्हणजे तपासणीसाठी स्राव दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी हा अहवाल आला आहे. मागील आठवड्यात महापालिकेतील अधिकारी व चार कर्मचारी बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या रामकरण सारडा वसतिगृह येथील स्राव संकलन केंद्रात कोरोना तपासणीसाठी … Read more

अहमदनगर महापालिकेचे कामकाज बंद !

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  :  महापालिकेतील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर कर्मचारी युनियनने काम बंद केले. जोपर्यंत पर्यायी इमारत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम बंदच राहील. प्रशासनाने प्रतिबंधात्मक साधने न पुरवल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला. संपूर्ण शहरात कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांनाच बाधा झाली. आतापर्यंत … Read more

‘…अन्यथा या अनर्थास मनपा जबाबदार असेल’

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  पावसाळ्यामध्ये शहरातील काही भागांमध्ये नेहमीच पाणी शिरण्याच्या तक्रारी समोर येत असतात. या गोष्टीला मनपाचे कामकाजाचे नियोजन तसेच इतर काही नैसर्गिक गोष्टीही कारणीभूत असतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे मनपा कायमच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील गायब झालेले नैसर्गिक ओढे, नाले शोधावेत अन्यथा भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या … Read more

धक्कादायक : महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :महापालिकेतील नगररचना विभागातील कर्मचाऱ्यासह एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. महापालिकेत कोरोनाने प्रवेश केल्याने अनेकजण धास्तावले आहेत. आरोग्य विभागाने थेट संपर्कात आलेल्या १४ जणांना तपासणीसाठी पाठवले आहे. शहरभर कोरोना झपाट्याने वाढत असताना महापालिकेत कोरोनाने शिरकाव केला नव्हता. गुरुवारी प्रथमच मनपातील दोन कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यात नगररचनातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील एका कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबबत सविस्तर वृत्त असे कि, नगर रचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये … Read more

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना धमकी !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  विनापरवाना मुख्यालय सोडल्याबाबत जाब विचारणाऱ्या महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची थेट मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा वजा धमकी मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांनी दिली आहे. आपण मागासवर्गीय अधिकारी असल्याने वारंवार, जाणीवपूर्वक मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोपही लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या खुलाश्यात केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मनपाच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. डिसेंबरपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने शुक्रवारी मायकलवार यांची नियुक्ती करून या विषयावर पडदा टाकला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर शहरात तब्बल तीन टन प्लॅस्टिक जप्त

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बालिकाश्रम रोड परिसरातील एका घरातून महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.5) कारवाई करत बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे तीन टन माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज कासलीवाल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी दिली. शासनाने सिंगल युज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातलेली … Read more