संपत बारस्कर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी नगर महापालिकेत मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला डावलून चक्क राष्ट्रवादीच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ टाकली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना या निवडीचे पत्र … Read more

पोटनिवडणुकीत फक्त शिवसेनेचा ‘पराभव’ नाही, अनिल राठोडांसह शिवसेनेने ‘हे’ गमाविले आहे !

अहमदनगर :- महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालाचा दुहेरी फटका शिवसेनेला बसला आहे. निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने आपल्याकडे असलेली जागा गमवावी लागलीच व आता महापालिका स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीतील प्रतिनिधित्वही प्रत्येकी एका सदस्याने कमी झाले आहे. महापालिका स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये प्रत्येकी १६ सदस्य असतात. महापालिकेचे ६८ नगरसेवक असल्याने या सदस्य संख्येने … Read more

या कारणामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला….

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता दळवी यांचा १ हजार ७१२ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेत राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप सत्तेत आहे. असे असतानाही राज्याच्या धर्तीवर नगर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more

आमदाराच्या प्रभागातच स्वच्छता मोहिमेचे वाजले बारा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक समाजिक संस्था, महापालिका प्रशासनास नगरकर सरर्सावले आहेत. त्यासाठी शहरात रात्रंदिवस घंटागाड्या फिरत असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. व कचरा पेटविण्यासही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातच कचरा धगधगत असून एक … Read more

मनपाच्या आवाहनाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रतिसाद; परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : प्रोफेसर कॉलनी परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता सर्वेक्षणात व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे. प्रत्येक विक्रेत्याने स्वखर्चातून ‘डस्टबिन’ ठेवत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्यांचे आभार मानले. स्वच्छता सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरात विविध उपाययोजना राबवत स्वच्छतेसाठी सर्वांच्या … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर; नागरिकांसाठी मोबाईल ॲप कार्यान्वित

अहमदनगर : शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने मनपाने अँड्राईड अ‍ॅप तयार केले असून, हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्ले स्टोअरमधून Ahmednagar-SWM टाकून ॲप डाउनलोड करावे, … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. ओडीएफ++ … Read more

स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात ‘आर्थिक’ वाद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर महानगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात चांगलेच वाद झाल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून एक नाव आले, अन् स्वतःच्या अधिकारातच महापालिकेच्या दोन पदाधिकार्‍यांनी दुसर्‍याचाच अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. रात्री … Read more

नगरसेवक गुंड आहेत काय ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेची महासभा सुरू झाली आणि द्विवेदींनी स्वीकृत नगरसेवकपदांसाठी आलेल्या पाचही प्रस्तावांची छाननी केली असून, कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने हे पाचही प्रस्ताव अमान्य करत तशी शिफारस महापौरांना करीत असल्याचे स्पष्ट केल्यावर महासभेत सन्नाटा पसरला व सर्वच नगरसेवक सुन्न झाले. अखेर आयुक्तांनी अमान्य केलेल्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करणेच महापौर वाकळेंनी पसंत केले. पण त्यानंतर भाजप, … Read more

आमदार संग्राम जगताप यांची अजितदादांकडे तक्रार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीत अजित पवार यांनी दिलेला आदेश डावलल्याने माजी नगरसेवक संजय घुले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले ! राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या दोन नावांपैकी एक नाव माजी नगरसेवक संजय घुले यांचे करावे व दुसरे … Read more

ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरात आज राजकीय भूकंप झाला आहे,महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपाच्या गटनेत्यांनी बंद पाकीटाद्वारे सुचविलेली पाचही नावे जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविली आहेत. शिवसेनेकडून संग्राम शेळके, मदन आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा गाडळकर, विपुल शेटिया आणि भारतीय जनता पक्षाकडून रामसदार आंधळे यांची नावे सादर करण्यात आली होती. ही नावेच महापालिकेचे … Read more

तर नगरला 25 कोटींचे पारितोषिक मिळेल : महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वच नगरकरांनी सहभागी व्हावे. मनपाकडे घंटागाड्या आहेत. कचरा घंटागाडीत टाकावा. इतरत्र कचरा टाकू नये. या संदर्भात प्रबोधन व जनजागृती करावी. कुणी ऐकत नसेल, कचरा टाकत असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल. आपण ‘थ्री स्टार’ रँकींगच्या शर्यतीत असून, सर्वांनी सक्रिय सहभाग दिल्यास शहराला 25 कोटींचे पारितोषिक निश्चित मिळेल, असा … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग पंधरा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर! नागरिकांसाठी अँड्रॉईड अ‍ॅपची निर्मिती

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने अँड्राईड अ‍ॅप महापालिकेने तयार केले असून, लवकरच हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा … Read more

सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग सहा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर :- शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. व्यापार्‍यांच्या आडकाठीमुळे थांबलेली कारवाईही पुन्हा सुरू झाली असून, सोमवारी (दि.30) एकाच दिवसांत मनपाने 42 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत कारवाईवेळी व्यापार्‍यांनी पथकातील कर्मचार्‍यांना अरेरावी केली होती. दंड भरण्यास नकार देत कर्मचार्‍यांना हुकसकावून लावले होते. व्यापारी … Read more

अब की बार, थ्री स्टार : स्वच्छता सर्वेक्षणात नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग घेतलेला आहे. महापालिकेच्या वतीने स्वच्छता विषयक उपाययोजनांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात ‘थ्री स्टार’ मानांकन मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू … Read more

‘स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण’मध्‍ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने अहमदनगर शहरामध्‍ये स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण अभियान अंतर्गत स्‍वच्‍छता मोहिम सुरू आहे. स्‍वच्‍छतेसाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांना स्‍वच्‍छतेमध्‍ये भाग घेण्‍याबाबत जनजागृती करण्‍यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या स्‍वच्‍छता सर्व्‍हेक्षण अभियानात सहभाग घेवून मनपास सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलेले आहे. तसेच अहमदनगर शहरातील ब-याच … Read more