जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करताना बीएड अथवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस पाठवलेल्या १३३ जणांवर कारवाईची टांगती तलवार असून, या शिक्षकांकडून पुराव्यासह लेखी खुलासा प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आला आहे. पदोन्नती, वेतनश्रेणीत वाढ होण्यासाठी शिक्षकांना बीएड, पदवीची आवश्यकता असते. अनेकदा शिक्षक त्यासाठी मुक्त विद्यापीठ … Read more

त्याने तरुणीचा विनयभंग केला आणि म्हणाला ‘मी उद्या पुन्हा येईल’!

अमरावती :- विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल ह्या विधानाने चांगलीच गाजली, फडणवीस यांचे हेच वाक्य चक्क एका तरुणाने विनयभंग करताना वापरलेय. याबाबत सविस्तर माहिती अशी कि  कपडे धुणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेची छेड काढून ‘मी उद्या पुन्हा येईल’ अशी धमकी देणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाविरुद्ध माहुली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून रविवार, … Read more

संतापजनक : आई आणि मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार !

अमरावती ;- हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात असताना अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.  अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेसह तिच्या २१ वर्षीय मुलीवर दहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रविवारी (दि. १५) दहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा … Read more

महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव

मुंबई :-  पशुवैद्यक डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीने ‘दिशा’ विधेयक मंजूर केले आहे. यात अशा प्रकरणांमध्ये २१ दिवसांच्या आत निकाल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत राज्य सरकार जानेवारी … Read more

मुंडे, धस, ठाकूर नाही तर या नेत्याची झाली विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड

मुंबई :  नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात माल घालून बीजेपीच्या सर्व नेत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.   … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन का केले हे कधीच सांगणार नाही ! 

पुणे : मी माझे गूढ कधीही उकलणार नाही. मला बंधन घालू नका, असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्याच्या केलेल्या प्रयत्नाबाबत पवार यांनी हे सूचक विधान केले. आता पुन्हा भाजप शिवसेनेला अप्रत्यक्षपणे सत्तास्थापनेची ऑफर देत आहे, त्याबद्दल विचारता ते म्हणाले, ‘कोणी कोणाला ऑफर द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न पण … Read more

मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्यानंतर मुलीला घरात घेण्यास नकार

अमरावती : हॉटेलमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मुलीला तिच्या पित्यासमोर उभे केले असता पित्याने यूटर्न घेत तिला पुन्हा घरात घेण्यास नकार दिला. पित्याच्या नकार घंटेमुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी बाल न्याय समितीच्या अनुमतीने अल्पवयीन मुलामुलीस सुधारगृहात पाठविले. बुधवारी (ता.४) मुलीच्या (१४) पित्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात अल्पवयीन मुलाविरूद्ध … Read more

विखे कुटुंब अशा पद्धतीने वागणार असेल तर भविष्यात याचे विचित्र पडसाद उमटतील !

अहमदनगर :- माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी ताई विखे पाटील व माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केले आहेत.  जास्तीत जास्त निधी पळविण्याचे काम ‘जिल्ह्यातील महिला झेडपी सदस्य ग्रामीण भागातील आहेत. काही अशिक्षित आहेत; तसेच काही सदस्यांना प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नाही. याचा गैरफायदा घराणेशाहीतील कुटुंबांनी उचलला … Read more

अखेर ‘त्या’ ज्वेलर्सच्या फरार बंधूंना अटक

ठाणे : अखेर गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना बेड्या ठोकण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांनाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हे दोघे भाऊ मागील दीड महिन्यापासून फरार होते. १ हजार १५४ गुंतवणूकदारांची अंदाजे २५ कोटी रुपयांची फसवणूक या दोघा भावांनी … Read more

साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह !

औरंगाबाद: शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह असल्याची भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे. व्यक्ती गायब होण्याच्या अशा प्रकारातून मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एस. एम. … Read more

भारतीय जनता पक्ष माझ्या बापाचा,तो सोडणार नाही !

बीड :- भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कार्यालयातून बाहेर काढून घराघरात पोहोचवली. त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष केला. यामुळे हा पक्ष माझ्या बापाचा असून आपण तो सोडणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केली. याचबरोबर पक्षातील काही लोकांना आपण पक्षात नसावे, असे वाटत असेल तर तो निर्णय मात्र त्यांनी घ्यावा, असा … Read more

पंकजा कोअर टीममधून बाहेर, फडणवीस यांच्यावर डागली तोफ

 बीड: स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे परळीत गुरुवारी मेळावा घेण्यात आला. यात पंकजा मुंडेंसह नाराज नेत्यांची भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे टीका केली. पक्षात लोकशाही उरली नसल्याचे सांगत पंकजांनी भाजपच्या कोअर कमेटीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात पंकजांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांतील अप्रत्यक्षपणे … Read more

धक्कादायक! चालत्या कारमध्ये तरुणावर ३ तास सामूहिक बलात्कार !

वृत्तसंस्था :- मुंबईत एका २२ वर्षीय तरुणावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ डिसेंबर रोजी घडली आहे.या पिडीत तरुणावर चार आरोपींनी तब्बल ३ तास चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि नंतर रस्त्यातच फेकून दिलं. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि,८ डिसेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास २२ वर्षीय तरुण कुर्ला पश्चिम येथील नवाब शीख … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: उद्या होणार शिवनेरीवर शेतकरी कर्जमाफीची घोषणा?

मुंबई : महाविकास आघाडी चे सरकार आल्या नंतर कर्जमाफी होणार असल्याचे संकेत सर्वच नेत्यांनी दिले आहेत. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे. शिवरायांच्या जन्मस्थळावर उद्धव ठाकरे कर्जमाफीची मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ

कोपरगाव : आगामी वरसात पाच सहा महिन्यांनी राजकारणात उलथापालथ व्हईल. लक्ष्मीला पिडा राहील. ज्येष्ठामधी पाऊस पडलं. आषाढ महिन्यात पाऊस येणार नाय. कौर नक्षत्रात पाऊस पडल व पेरण्या व्हतिल. मनुष्याला पिडा राहील. चैत्र महिन्यात गारा पडतील. पिवळ्या धान्याला महागाई राहील. नदीनाल्यांना पूर येतील. जसा माझा आनंद केला तसा नगरीचा आनंद राहील, असे व्हईक तालुक्यातील भोजडे येथील … Read more

भूमाता ब्रिगेड’च्या संस्थापक तृप्ती देसाई यांना अटक

अमरावती :- हैदराबादमधील डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आले. या लाजिरवाण्या घटनेच्या विरोधात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करत असताना महिला कार्यकत्र्या तथा ‘भूमाता ब्रिगेड’च्या संस्थापक तृप्ती देसाई यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलेले आहे. हैदराबाद येथे प्रियंका रेड्डी या डॉक्टर तरुणीवर … Read more

छेड काढून मुलीस घरासह पेटवण्याचा प्रयत्न

उमरगा :- तालुक्यातील मुळज येथील एका महाविद्यालयीन मुलीची सातत्याने छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक व पोक्सो अंतर्गत सोमवारी (दि.२) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाविद्यालयीन युवतीने उमरगा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुळज येथील अजित लहू मुळजे हा महाविद्यालयास जात असताना वारंवार छेड काढत अश्लील इशारे … Read more

जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत करायचा अत्याचार!

चिखली :- जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे प्रकरण देऊळगाव घुबे गावात उघडकीस आले आहे. सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईकांच्या मदतीने मुलीने पोलिसांत तक्रार दिली. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने नातेवाईकांना याची माहिती दिल्यानंतर बापाला समजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र बापाने … Read more