MPSC Result : राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवेच्या (मुख्य) लेखी परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाला. एकूण १ हजार ९५४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाकडून २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. दहा महिन्यांच्या कालावधीनंतर निकाल जाहीर झाला आहे. … Read more