शेतकऱ्याच्या पोराचा एमपीएससीत चमत्कार ! जिद्द आणि कठोर मेहनतीने MPSC त मिळवलं यश ; बनला STI

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Success Story : शेतकऱ्याची पोर आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मग ते क्षेत्र स्पर्धा परीक्षेचा का असेना. या क्षेत्रात देखील शेतकऱ्यांच्या पोरांनी पार राडा माजवला आहे. आपल्या कष्टाच्या जिद्दीच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतकरी पुत्रांनी एमपीएससी सारख्या कठोर परीक्षेत देखील आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ग्रुप बी अंतर्गत येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या एसटीआयच्या परीक्षेत अनेक शेतकरी पुत्रांनी घवघवीत असे यश संपादित केल आहे.

नांदेड जिल्ह्यातील पांडुर्णी येथील विकास सूर्यकांत श्रीरामे याने देखील या परीक्षेत अभूतपूर्व अशी कामगिरी करत एसटीआय पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत त्याने एनटी प्रवर्गातून राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच सर्वसाधारण प्रवर्गातून तो राज्यात 22 व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

विकास हे शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे वडील सूर्यकांत श्रीरामे हे पाच एकर कोरडवाहू शेतजमीनीतून मिळणाऱ्या कवडीमोल उत्पन्नातून आपल्या व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात. त्यांना 2 मुलं आहेत. खरं पाहता दुष्काळी भाग असल्याने तसेच त्यांची जमीन कोरडवाहू असल्याने त्यांना शेतीतून नगण्य उत्पन्न मिळतं.

या तोकड्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं वं आपल्या संसाराचा गाडा देखील हाकला. पांडुरंग आणि विकास हे दोन्ही शिक्षणात हुशार. विकास यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत केले. राठोड बंधूंच्या विमुक्त जाती सेवा समिती कोटग्याळ या ठिकाणी दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी मध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर त्यांनी परभणी येथे कृषी विद्यापीठातून बी टेक फूड टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त केली.

पदवी ग्रहण केल्यानंतर विकास नोकरीसाठी शोधाशोध करत होते. मात्र त्यांच्या थोरल्या बंधूंनी वडिलांना शेतीमध्ये मदत करण्याबरोबरच एका प्रायव्हेट बँकेत व्यवस्थापकाचा जॉब सुरू केला. यामुळे साहजिकच परिवाराची आर्थिक निकड त्यांच्या मोठ्या बंधूंनी पूर्ण केली. यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं यासाठी मोठ्या बंधूंची साथ लाभली.

मग काय शिक्षणाच माहेरघर पुण्यात येऊन विकासने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अखेर आपल्या जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने, योग्य नियोजनाने प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी एमपीएससीसारख्या कठोर परीक्षेत यश संपादन करत एसटीआय पदाला गवसणी घातली. निश्चितच या शेतकऱ्याच्या मुलाच्या यशाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.