धक्कादायक ! जावयास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिसांनी यातील 7 आरोपींना सायंकाळी ताब्यात घेवून अटक केली. याबाबत … Read more

सासरच्या जाचाला कंटाळवून विवाहितेने माहेरी आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. प्रतिभा दीपक दाणे, वय २४ हिला नवरा दीपक याने वेळोवेळी दोन वर्षापासून दारु पिवून शिवीगाळ करणे मारहाण करणे असा त्रास दिला. ३ मार्च २०२१ व ४ मार्च २०२१९ रोजी वाढदिवसासाठी रहाते गावी माहेरी जाण्याच्या कारणातून आरोपी नवरा दीपक दाणे व सासरा प्रभाकर दाणे … Read more

शेतकऱ्याने पेटविला दीड एकर ऊस; जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-मुळा कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही देत नसल्याने हनुमानवाडी येथील ॠषीकेश वसंत शेटे यांनी गट नंबर ५६६ मधील दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले. महाविकास आघाडी सरकार व संबंधित मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी परीसरातील शेतकरी,पोलिस बंदोबस्त व बघ्यांची गर्दी जमा झाली होती. दरम्यान काही … Read more

शिवसेनेच्या ‘त्या’ मंत्र्याचा बेबंदशाही विरोधात मुख्यमंत्री किमान एकदा तरी बोलणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून १९ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्‍याने उस पेटविल्यानंतर आणखी एका शेतकर्‍याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला. घाम गाळून कष्ट घेणार्‍या शेतकर्‍याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील. अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणार्‍या छळावर … Read more

शेतीच्या वादातून तिघांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- नेवासा तालुक्यातील पिंप्री शहाली शेतीच्या बांधाच्या वादातून तलवार, चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण करुन चौघा जणांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत संगिता ताराचंद नवथर (वय 50) रा. पिंप्रीशहाली ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे काम पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला. आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. कौठा-म. ल. हिवरा हा गावापासून ते गुप्त पुलापर्यंत रस्ता खराब झाला होता. पावसाळ्यात कोणतेही … Read more

चोरटे जोमात बळीराजा कोमात!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून हे चोरटे शेतकऱ्यांच्या विहिरीतील इलेक्ट्रिक मोटारी चोरुन नेत आहेत. यामुळे मात्र शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काल एकाच दिवशी जिल्ह्यातील पारनेर, नेवासा व श्रीगोंदा या ठिकाणी चार मोटारी व एक डिझेल इंजिन चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिली घटना … Read more

अखेर ‘ती’ स्कूल बस नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सापडली!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  अलीकडे चोरट्यांना कोणत्या वस्तूची चोरी करावी याचे ताळतंत्र राहिले नाही. नुकताच काही तरूणांनी गावी जाण्यासाठी चक्क एसटी बस चोरल्याची घटना घडली होती. आता तर थेट स्कूल बसचीच चोरी केली होती. ठाणे जिल्ह्यातुन चोरलेली एक स्कूल बस शेवगाव तालुक्यात सापडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ … Read more

भाजीपाला फळे विकण्यास मज्जाव; संतप्त विक्रेत्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- सध्या नगरपंचायत अंतर्गत शहरात भव्य कॉम्प्लेक्स चे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे भाजी मंडई मध्ये फळे विक्रेत्यांना जागा उपलब्ध नाही म्हणून सदरील ठिकाणी हातगाडी लावून फळे विक्री करत आहेत. मात्र शहरातील नगर पंचायत परिसरात भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होतं असल्याने पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सकाळी … Read more

 अज्ञात व्यक्तीने वांबोरी चारीची पाईपलाईन फोडली! पाथर्डी पोलीसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- पाथर्डी – नगर – राहुरी- नेवासा तालुक्यातील ४५गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील करडवाडी नदीजवळ सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडली. यामुळे तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेला पाणीपुरवठा बंद झाला असून ,पाईप लाईन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी पाथर्डी पोलीसात … Read more

सरकारी जमीन लुबाडण्याचा डाव; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या जमिनीच्या उतार्‍यावर खासगी व्यक्तीचे नाव लावून ते हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कुकाणा येथील जंगल रामभाऊ चाकणे यांची 1 हेक्टर 14 आर जमीन मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा धरणाच्या कार्यालयीन कामकाजासाठी 1967 मध्ये खरेदी … Read more

कोरोनाची कुणालाही भीतीच नाही : घोडेगावच्या बाजारात हजारोंची गर्दी ! न मास्क ना सॅनिटायझर …

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यात कोरोना रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ,अनेक उपाययोजना ,बंधने येत आहेत .राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला . अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालीये , अहमदनगर जिल्हा प्रशासनास याचा विसर पडल्याचे जाणवतेय कारण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला नेवासा तालुक्यातील घोडेगाव जनावरांचा बाजारात कोरोनाची कसलीही भीती नसल्याचे चित्र आहे … Read more

शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-विजेच्या शॉर्टसर्किटने एक एकर ऊस आगीत जळून खाक झाला. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात घडली. यात  जयवंत किसन जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शनिवारी देखील याच ठिकाणी तारांमध्ये मोठ्या प्रमाणात घर्षण झाले होते. त्यात पाचेगावातील संतोष भाऊसाहेब साळुंके या शेतकऱ्याचा ऊस आगीतून वाचविण्यात यश … Read more

लुटमारीच्या घटना सुरूच; नगर-औरंगाबाद मार्गावर ट्रकचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- शहरात गुन्हेगारी वाढू लागली आहे, दरदिवशी लुटमारीच्या घटना घडत असून यामुळे नागरिकांसह वाहनधारकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात ट्रकचालकास लुटण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत ट्रकचालक शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद (वय २१, रा. गौरीगंज, उत्तर प्रदेश) यांनी नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-शनिवारी दुपारच्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, यामध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हि धक्कादायक घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम गोदावरी पुलाजवळील जुन्या सलाबतपूर रस्त्यानजीक घडली आहे. या अपघातात प्रदीप अण्णासाहेब पाडे (वय १९, रा. वडगाव कोल्हाटी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व गोरख जगन्नाथ … Read more

क्रूर सासऱ्याने जावयाचा निवारा दिला पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- नेवासा तालुक्यातील मुळा कारखाना गट ऑफिसलगत एका सासऱ्याने चक्क आपल्या जावयाची झोपडीच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गाडी यार्ड मधील तोडणी कामगार असलेले अविनाश दादाहरी सावंत मुळा कारखाना गट ऑफिसजवळ मुळा कारखान्याच्या मालकीच्या जागेत झोपडी टाकुन राहत होते. या झोपडीत त्याची आई कलाबाई … Read more

महसुल विभागाच्या आक्रमक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान या वाळू तस्करांविरुद्ध महसूल विभागाने आक्रमक कारवाईस सुरुवात केली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगावात अनधिकृत वाळू तस्करी करणाऱ्यांवर माहुल विभागाने थेट कारवाई केली आहे. महसूलच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

कांद्याचे भाव वधारले; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली होती. यामुळे कांडा उत्पादाक शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला होता. मात्र नुकतेच कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवक व भावात काल आणखी वाढ झाली असून काल … Read more