कोव्हिड काळात हलगर्जीपणा भोवला! ‘त्या’ चार डॉक्टरांवर कारवाई 

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोविड सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांची तपासणी करण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्या मुळे पारनेर तालुक्यातील चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर असे की, राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या डॉ. सचिन सोनवणे, डॉ. पुजा म्हस्के, डॉ. तेजश्री ढवळे, डॉ. आडसूळ यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी … Read more

अरे बापरे! चक्क कारागृहातील  गुन्हेगारांकडे मोबाईल! ‘या’ पोलिस स्टेशनमधील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कारागृहात गंभीर गुन्ह्यांत अटक असलेल्या दोन कैद्यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल आढळून आले आहेत. हा प्रकार पारनेर पोलिस ठाण्यात घडला असून, याप्रकरणी आरोपींना जेवण/भत्ता देणारा मोबाईल पुरवणारा सुभाष लोंढे, प्रविण देशमुख (रा.सुपा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे मोबाईल आढळून आले … Read more

टाळेबंदीतही पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोमात

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-टाळेबंदीत देखील पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून, वाळू वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक आर्थिक हितसंबंध असल्याने जाणीवपुर्वक कारवाई करीत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. तर या प्रकरणी उपलब्ध असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पहाणी करुन संबंधीत … Read more

खा. विखे म्हणाले ‘ही वेळ’ राजकारण करण्याची नव्हे तर कोरोनाविरोधात सर्वांनी ‘एकत्र’ येण्याची!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाने आज संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. त्यामुळे ही वेळ राजकरण करण्याची नसून, या कोरोना महामारी विरोधात सर्वच लोकप्रतिनिधींसह राजकारणी समाजकारणी तसेच अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढण्याची असल्याचे नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटरला त्यांनी काल भेट … Read more

आमदार लंके यांनी ‘तो’ शब्द पाळला! बिनविरोध ग्रामपंचायतींना दिला २५ लाखांचा निधी ! 

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- बिनविरोध निवडणूक करा, ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो. असे आवाहन करणाऱ्या आ. लंके यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना ‘तो’ निधी मंजुर करण्याची जबाबदारी पार पाडली आहे ! तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडूकांदरम्यान आ. नीलेश लंके यांनी मतदार संघातील नागरीकांना बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो असे आश्‍वासन आ. … Read more

अरेच्चा! ‘या’ आमदाराच्या कोविड सेंटरला मिळतेय देश- विदेशातून मदत

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी देशविदेशातून दररोज मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. आतापर्यंत ५० लाख रूपये जमा झाले असून, गावागावांमधून विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला, फळे, अंडी, दुध आरोग्य केंद्रामध्ये आणून देण्यात येत आहे. विविध … Read more

यात्रा रद्द… कोरोनामुळे गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा प्रसिद्ध आहे. नगर व पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील भाविकांच्या उपस्थितीने व्यापक स्वरूपात हा यात्रोत्सव, कुस्त्यांचे फड येथे रंगतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून सुपा (ता. पारनेर) परिसरातील यात्रा भरवता येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले … Read more

कोरोना : सलग दुसऱ्या वर्षी ‘ही’ यात्रा रद्द!

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील श्री काळ भैरवनाथ यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. यंदाही यात्रोत्सव होणार नसल्याने अनेक वर्षांची धार्मिक परंपरा खंडीत होत असल्याने भाविकां नी नाराजी व्यक्त केली. गेल्या … Read more

आमदारांनी दिलेला शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान आ. लंके यांनी मतदारसंघातील नागरिकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले होते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो, असे आश्‍वासनही लंके यांनी दिले होते. दरम्यान आमदार लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजूर केला आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला, अशी … Read more

कर्मचारी नसल्याने टाकळीढोकेश्‍वरच्या जिल्हा बँकेच्या शाखेत ग्रामस्थांची गर्दी व गैरसोय

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील जिल्हा सहकारी बँकेतील कॅशियर मयत होऊन चार महिने होऊन देखील त्याजागी नवीन कॅशियरची नेमणुक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेत ग्रामस्थांची गर्दी होऊन, मोठी गैरसोय होत असल्याने सदर प्रश्‍नी तातडीने टाकळीढोकेश्‍वर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कर्मचारी (कॅशियर) उपलब्ध करुन देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा … Read more

आ. निलेश लंकेना मंत्री करा, उत्तर नगर जिल्ह्यातून सुरू झाली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात पारनेरचे आमदार निलेश लंके स्वतःला झोकून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. त्यांचे कोरोना काळातील कार्य उल्लेखनीय असल्याने नगर जिल्ह्यात कोविडची परिस्थिती आटोक्यात यावी यासाठी आमदार लंके यांच्यावर मंत्री म्हणून मोठी जबाबदारी द्या , अशी मागणी अकोले येथील पंचायत समितीचे माजी … Read more

आमदार लंके रुग्णालयात भरती झालेले तालुक्याला आणि आम्हाला परवडणारे नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, टंचाई भासणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. प्राणवायूचा पुरवठाही सुरळीत होईल, असेही मंत्री थोरात म्हणाले. येथील गणेश मंगल कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी काेरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. … Read more

आमदार असावा तर असा… ११०० खाटांचे कोविड केंद्र, पहिल्याच दिवशी तब्बल १७ लाख जमा ,५ टन धान्य आणि…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-काेरोना बाधित रुग्णांसाठी आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे सुरू करण्यात आलेल्या शरदचंद्र आरोग्य मंदिरातील (कोविड उपचार केंद्र) अन्नदानासाठी तसेच विविध सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. आतापर्यंत १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले. तालुक्यातील मुंगशी येथील ग्रामस्थांनी गावातून जमा केलेले ५ टन धान्य व रोख ५० … Read more

पारनेर तालुक्यातील आदिवासी बांधव शासकीय योजनेपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थांना तहसील कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी रेशनकार्ड देण्याची तसेच त्यांच्या सातबारा उतार्‍याची ऑनलाईन दुरुस्ती करण्याची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

पारनेर तालुक्यात १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असून, या महाजंगी कोव्हिड सेंटरचे १४ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष पुढाकारातून या महाकोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हे कोव्हिड सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार … Read more

पोलीस अधीक्षक कार्यालयातील तो पोलीस कर्मचारी हप्ते घेण्यासाठी दिवसाआड पारनेरला

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या त्या पोलीसांची चौकशी करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही हा … Read more

३६ लाख खर्च करून बनविलेला रस्ता उखडला

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- नगरपंचायतीच्या वतीने पारनेर तालुक्यातील बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्यासाठी ३६ लाख रुपयांचा निधी डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे. काम अंतिम टप्प्यात असून ठेकेदाराने दोन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण केले. डांबरीकरण पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही, तोच रस्ता उखडून त्यातून माती दिसू लागल्यावर बुगेवाडी ग्रामस्थांनी तातडीने नगरपंचायतीमध्ये जाऊन मुख्याधिकारी डॉ. … Read more

बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट घोगावु लागले….

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-वातावरणात पुन्हा बदल होऊ लागला आहे. कडाक्याच्या उन्हातून वातावरण ढगाळू झाले आहे. हळूहळू वाऱ्याचा वेग देखील वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारपासूनच उष्मा अधिक जाणवत होता. ढगाळ वातावरण व वाराही वाहू लागला. सायंकाळी चार ते पाचच्या … Read more