पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  ठाण्याहून टाकळी ढोकेश्वर येथे आलेल्या ३६ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे. सर्व पाच रुग्ण मुंबई, ठाण्याहून आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून टाकळी ढोकेश्वर येथील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. हिवरे कोरडा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावासमोर बहिणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या आंब्याला दोरीने गळफास घेऊन 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आपल्या 9 वर्षांच्या भावासमोरच तिने हे कृत्य केले. ती आत्महत्या करीत असताना भावाने वाचण्याचा प्रयत्न केला होता. का अन्य तिसरेच कारण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. पूजा झारदास भोसले हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण …

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आज सायंकाळी आला आहे. हा व्यक्ती हिवरे कोरडा येथे 1८ मे रोजी हा रूग्ण आपल्या पत्नी व दोन मुलीसह ठाण्यावरून तो गावी आला होता. हा पुरूष ४८ वर्षीय असुन तो कुटुंबासह गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आठ दिवस विलगीकरण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पुणे – नगर रोडवरील सुपा टोलनाका चौकात एका कारची दुभाजकास धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) (वय २५, रा.पुणे, मूळ रा.उत्तरप्रदेश), अक्षय सुनील मकासरे (वय २५, रा.औंध, कस्तुरबावस्ती पुणे), … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- सुपे जवळ कंटेनरच्या भीषण अपघातात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता तालुक्यातील उक्कलगाव आठवाडी येथील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील सुपे गावाजवळ घडली. दत्तात्रय लक्ष्मण गांगुर्डे (वय २७), केशव हरिभाऊ बर्डे (वय ३०) हे शिरूरहून मोटारसायकलवरून घरी येत होते. सुप्यानजीक हाॅटेलात नाश्ता केला. तेथून नगर जवळील नांदगाव शिगंवे जवळपास … Read more

पारनेर मध्ये जिवंत बॉम्ब आढळला !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी काळकूप परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आला. स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने पाहणी केल्यानंतर सायंकाळी नगरच्या लष्करी तुकडीने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. संजय बांडे व त्यांच्या पत्नी वर्षा बांडे हे डोंगरावरून परतत असताना जमिनीमध्ये अर्धवट … Read more

‘या’ कारणामुळे झाला पारनेरच्या त्या तरुणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- मुंबईवरून पारनेर तालुक्यातील दरोडी मध्ये आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले होते त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचे त्याच्या मृत्युनंतर त्याची कोरोना चाचणी स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले होते. या अहवालानंतरच तो तरुण ‘सारी’ आजाराने मृत्यु झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली, … Read more

‘त्या’अहवालानंतर पारनेरकरांना दिलासा…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३४ वर्षांचा तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.दरम्यान, घशातील स्त्रावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या घाटकोपर येथून हा तरुण, त्याची पत्नी, भाऊ व भावजय तीन दिवसांपूर्वी दरोडी येथे आले. स्थानिक समितीने चौघांनाही संस्थात्मक … Read more

धक्कादायक : पारनेरमध्ये पुन्हा एकाचा मृत्यू,कारण मात्र अस्पष्ट !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  पारनेर तालुक्यात श्वसनाचा त्रास होत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रविवार दि.१७ मे ला सायंकाळी दरोडी येथील तरुणास तत्काळ अहमदनगर ला हलविले होते. आज सोमवार दि.१८ मे ला शासकीय रुग्णालयात त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. नमुने तपासणीसाठी पाठविण्यात असुन, उपचार चालु असताना उपचारा … Read more

‘त्या’ तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता नगरमध्येच अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मृत्यूपश्चात स्त्रावाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निघोजमधील संबंधित तरूणाच्या संपर्कात आलेल्या सर्व दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे निघोज, पिंप्री जलसेन, पठारवाडी, तसेच चिंचोली येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मृताच्या १२ वर्षांच्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. तोही शनिवारी सायंकाळी निगेटिव्ह आला. दरम्यान, निघोज परिसरात मुंबईतील रेड झोनमधून दाखल झालेल्या … Read more

‘त्या’ महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-कोरोनामुळे निघोज येथील ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. तथापि, मृताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. इतर नऊ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने पिंपरी, निघोज, चिंचोली, पठारवाडी हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे. गुरुवारी … Read more

कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी … Read more

कोरड्या विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-कान्हूरपठार शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना कोरड्या विहीरीत पडलेल्या बिबट्यास पारनेर वनविभाग, नगरच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम व ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वा. कान्हूरपठार ते गारगुंडी रस्त्यावरील हनुमंत लोंढे यांच्या कोरड्या पडलेल्या सुमारे चाळीस ते पन्नास फुट खोल विहीरीत बिबट्या असल्याचे शेतकरी रामदास लोंढे … Read more

पारनेर तालुक्यात शिरला कोरोना, त्या तरुणाच्या मृत्यूमुळे भितीचे वातावरण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ‘त्या’ मृत व्यक्तीचा चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पारनेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे,यामुळे तालुका हादरला असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने पिंपरी जलसेन गाव सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत काल दि. १२ रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी जिल्हा रुग्णालयात … Read more

ब्रेकिंग : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  पोलिस ताब्यात असलेला आरोपीला घेऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयात जात असताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन तो पसार झाला. पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पारनेर पुरुष ठाण्यातील भादंवि 363 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या गुन्हातील आरोपी प्रविण उर्फ मिठू पोपट गायकवाड याला तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या कडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तरुण जागीच ठार

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील वडझिरे परिसरातील कृष्णतारा पेट्रोलपंपाचे जवळील वळणावर झालेल्या टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातामधे देवीभोयरे येथील तरुण जागीच ठार झाला. पारनेर-बेल्हे रस्त्यावर टाटा टेम्पो (एमएच ४२ टी-१०१३) जात होती. समोरून येणाऱ्या मोटरसायकलची (एमएच १६, एडी २७३९) आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये देवीभोयरे (माळवाडी) येथील प्रमोद किसन मुळे … Read more

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूमुळे पारनेर तालुक्यात भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- निघोज येथील रहिवासी असलेला हा तरूण ३ मे रोजी मुंबईहून सासुरवाडी पिंपरी जलसेन येथे पत्नी व दोन मुलांसह आला होता. प्रशासनाने संपूर्ण कुटुंब जि. प. शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले. तरूणास काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. परंतु विलगीकरण कक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा तरूण निघोज येथे डॉक्टर असलेल्या भावाकडे … Read more

बिग ब्रेकिंग : मुंबईतून आलेल्या तरुणाचा मृत्यू ! श्वसनाचा त्रास असल्याने मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्या 39 वर्षीय तरुणाचा मंगळवार (दि. 12) सकाळी मृत्यू झाला. 3 मे रोजी हा तरुण त्याच्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन मुंबई येथील घाटकोपर येथून पिंप्री जलसेनला सासुरवाडीत आला होता.तरूणाचा नगर येथे उपचारांसाठी नेताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यू कोरोनामुळे किंवा अन्य … Read more