अहमदनगर ब्रेकिंग : वाळूतस्करांकडून तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पारनेर :- पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी अवैध वाळूच्या वाहनाचा पाठलाग केल्याने वाळूतस्करांनी त्यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार- पारनेरच्या तहसीलदार ज्योती रामदास देवरे या दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ढवळपुरी शिवारात गस्तीसाठी गेल्या होत्या. या वेळी तहसीलदार ज्योती … Read more

किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार !

सुपा : अवकाळी पावसाचा फटका नव्या कांद्याला बसला आहे. बाजारात दाखल होत असलेला कांदा ओला असला तरी त्याला स्थानिक परिसरासून मागणी आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. मात्र, त्याचा साठा संपत आल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली असल्याचे कांदा व्यापारी सांगतात. पावसामुळे नव्या कांद्याचे झालेले नुकसान तसेच साठवणुकीतील जुना कांदा संपत आल्याने घाऊक बाजारात जुन्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नववीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक !

पारनेर :- विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या अविनाश वामन मधे (२० वर्षे, म्हसोबा झाप) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. मधे हा दुचाक्या चोरीतील आरोपी असल्याची माहितीही पुढे आली. २२ नोव्हेंबरला ही मुलगी मैत्रीणीबरोबर पवळदरा येथून शाळेत निघाली असता घाटात अविनाश दुचाकीवरून आला. … Read more

आमदार निलेश लंकेना भेटताच उद्धव ठाकरे म्हणाले …ओळखता आले नाही पण…

मुंबई – ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

कांदा @ ८३०० रुपये !

पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला क्विंटलमागे आजवरचा उच्चांकी ८३०० रुपये इतका दर मिळाला. परतीच्या पावसानंतर कांद्याचे दर कडाडले असून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये रोजच कांद्याच्या दराचे उच्चांक मोडले जात आहेत. कांदा दर वाढल्यामुळे घरगुती ग्राहक व हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात जुन्या … Read more

पारनेर मध्ये भांडणात एकाचा मृत्यू,एक गंभीर जखमी

पारनेर : तालुक्यातील घाणेगाव परिसरातील पारधी समाजातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. सुपा पोलीस स्टेशनला शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीत घटनेतील जखमी अक्षय अर्पण भोसले वय 17 वर्षे याने म्हटले आहे, मंत्री सिराज चव्हाण (रा. वाघुंडे) उंबर्‍या लहिन्या काळे, अक्षय उंबर्‍या काळे, संगड्या उंबर्‍या काळे, मिथुन उंबर्‍या काळे आणि … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील तरुणांनी चोरले पंचायत समिती सदस्य पतीचे ५५ लाख !

पारनेर : उद्योजक सुरेश धुरपते यांच्या आलिशान मोटारीतील ५५ लाखांच्या रोकड चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक जालन्याकडे रवाना झाले आहे.   बुधवारी पहाटे २.३० च्या सुमारास धुरपते यांच्या आलिशान मोटारीची (एम एच ४३ बी. एन. ४५४५) काच फोडून रोकड … Read more

 निकृष्ट दर्ज्यांच्या कामांचा आ. लंकेंनी केला पर्दाफाश 

पारनेर – सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली व सध्या सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा पर्दाफाश आमदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत केलेल्या पाहणीदरम्यान रविवारी केला.  लंके यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांची तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याच वेळी निकृष्ट कामांविषयी नाराजी व्यक्त करत या कामांची पाहणी करण्याचे जाहीर केले होते. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियांता राऊत, … Read more

तलवार हल्ला प्रकरणास वेगळे वळण … त्या तरुणावरही गुन्हा दाखल !

पारनेर :-  शहरातील बंडू ऊर्फ सौरभ मते याच्यावरील हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले. डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झालेला हल्लेखोर संग्राम कावरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून जखमी सौरभ याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १६ नाेव्हेंबरला गणेश व संग्राम कावरे बंधूंनी सौरभवर तलवार व चॉपरने वार केल्याने त्याच्यावर नगरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more

पारनेर मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

निघोज :-  पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी आढळला. ३५ वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता असून पांढऱ्या रंगावर काळे ठिपके आहेत. मृतदेह कुजला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी मृतदेह कुंड परिसरात पुरण्यात आला.

पारनेर पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा!

पारनेर: न्यायालयाचा विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच मारहाण केल्याप्रकरणी पारनेर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ३ महिलांचाही समावेश आहे. पारनेर पोलिस ठाण्याचे रामचंद्र पांडुरंग वैद्य व अण्णा चव्हाण हे दोघे पोलिस दीपक मार्तंड पठारे यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेला विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी त्यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी … Read more

या कारणामुळे झाला त्या तरुणावर तलवारीने हल्ला !

पारनेर :- शहरातील सौरभ ऊर्फ बंडू भीमाजी मते (२२) या तरुणावर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन तरुणांनी तलवार, तसेच चॉपरने वार केले. या हल्ल्यात बंडू मते हा गंभीर जखमी झाला असून त्यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर बंडू यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.शहरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भर चौकात तरुणावर तलवारीने हल्ला !

पारनेर :-पूर्ववैमनस्यातून पारनेर शहरातील एक तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.शहरातील बंडू मते या युवकावर सकाळी तलवारीने हल्ला झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, या युवकाचा चहाचा व्यवसाय असुन रोजच्या प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी येत असताना ६.३० च्या सुमारास आंबेडकर चौकात त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी बंडू यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविले असुन … Read more

पारनेरमध्ये जेसीबी पळविला !

पारनेर :- तहसिलदार व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह परिसरातून वनकुटे येथील चार वाळू तस्करांनी पळवला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस अधीक्षक ईशू सिंंधू यांनी वाळूतस्करी बंद करण्याच्या सूचना प्रत्येक ठाण्याच्या अधिकाऱ्यास दिल्याने वाळूतस्करी थंडावली होती. विधानसभा निवडणुकीत पोलिस तसेच महसूल यंत्रणा व्यग्र झाल्याने अवैध … Read more

पायरीवर नतमस्तक होत आमदार निलेश लंके विधिमंडळात !

Nilesh Lanke

पारनेर | पायरीवर नतमस्तक होत आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी विधिमंडळात प्रवेश केला. दिवसभर त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीसाठी लंके मुंबईत होते. बैठकीनंतर पक्षाच्या विविध नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. विधानसभेत काम करताना आपली बाजू कशी प्रभावीपणे मांडता येईल, याचे धडेही त्यांनी ज्येष्ठांकडून घेतले. बुधवारी सकाळी सहकाऱ्यांसह प्रथमच त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. मतदारसंघातील … Read more

अहमदनगर- पुणे महामार्गावर एकाचा मृत्यू

अहमदनगर- पुणे महामार्गावरील सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या सुपा बस स्थानक चौकात सोमवारी सकाळी 9 ते 9.30 दरम्यान एक जे. सी.बी. मशीन पारनेरकडून चौक ओलांडून पुण्याकडे वळत होता. तेवढ्यात अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने एक कंटेनर क्र. MH 20 DE 1553 हा जोरात येत होता. ऐन चौकात जे. सी. बी. व कंटेनर याची जोरात धडक होऊन दोन्ही वाहने … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून घरात घुसून लैंगिक अत्याचार

पारनेर :- तालुक्यातील वडगाव दर्या येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. मुलीचे आई-वडील जवळच्या गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने मुलगी घरी एकटीच होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला. त्याने पिण्यासाठी पाण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :रक्ताच्या नात्याला काळिमा वडिलांकडून मुलीवर अत्याचार !

पारनेर :- तालुक्यातील सुपे येथे वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासलीय. या घटनेमधील पीडिता अल्पवयीन आहे. वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,सुप्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वासनेची शिकार बनवली. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची … Read more