अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार महिलेस डंपरने चिरडले !

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार – टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या स्कुटीला जोराची धडक दिल्याने संपदा सुरेश साळवे (वय २६) या पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कान्हूर पठार येथून वाळू वाहतूक करणारा … Read more

‘या’तालुक्यातील ४३ गावात १० ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन…!

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   वेगाने होणारा कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पारनेर तालुक्यातील ४३ गावांमध्ये ११ दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत वैद्यकीय व कृषी संबंधित सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. टाळेबंदी लागू करण्यात आलेल्या गावांमध्ये पारनेर शहरासह, सुपे, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, निघोज, जवळे, वडझिरे, देवीभोयरे, … Read more

भरधाव कंटनेरने ब्रिझा कारला धडक दिली अन…?

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील सुपा टोलनाक्याजवळ पळवे शिवारात पुणे – नगर महामार्गावर भरधाव वेगातील कंटेनरने (क्र.एम एच ४६ ए एफ ४१०९ ) ब्रिझा कार (क्र.एमएच १६ बी वाय ८६४८ ) ला जोराची धडक दिली. यात कारमधील नामदेव ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु … Read more

धोका वाढला ! महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील 20 गावात लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांत कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात 31 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती … Read more

धक्कादायक दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्न, एकीचा मृत्यू दुसरी चिंताजनक

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थीनींनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न पारणेर तालुक्यातील पिंपळनेर येथे केला. मात्र या दोघीपैकी एकीला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपळनेर येथील विद्यालयात एक विद्यार्थीनी तर राळेगणसिद्धी येथील विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोघींनी … Read more

अरे देवा! ‘या’ तालुक्यातील ४३ गावांमध्ये परत लॉकडाऊन…?

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पारनेर तालुक्यातील कोरोना प्रभावीत ४३ गावांमध्ये ३१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पारनेर तालुक्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे नगर जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढला असून तालुक्यातील कोरोना निर्मूलन करण्यासाठी ४३ गावे पूर्णपणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ह्या दोन तालुक्यात पुनःश लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण पारनेर व संगमनेर तालुक्यात वाढत आहेत. कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राजकीय पदाधिकाऱ्याच्या पत्नीला खंडणीप्रकरणी अटक !

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक खळबळजनक अशी बातमी समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. … Read more

धक्कादायक! ‘तू’ कोणाच्या जीवावर उड्या मारतोस??  पत्रकारास रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे धमकी

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर जिल्हा सहकार क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. मात्र अलीकडे जिल्ह्याची ही ओळख पुसते की काय अशी शंका येते आहे. कारण साध्य जिल्ह्यात रोज चोरी, लूटमार, खून आशा घटना घडत आहेत. पारनेर तालुक्यात तर चक्क एका पत्रकारास तू कुणाच्या… आमदार निलेश लंके आणि राहुल झावरेच्या जीवावर उड्या मारतोस ना. … Read more

आमदार निलेश लंके यांच्या जीवावर उड्या मारतो‌ असे म्हणून पत्रकारास रिव्हॉल्व्हचा धाक…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  पारनेर येथील पत्रकार विजय भास्कर वाघमारे यांना आरोपीने फोन करून तू आमच्याविरुद्ध बातम्या छापतो काय असे म्हणत वाईट वाईट शब्दात शिवीगाळ करून पारनेर येथील आंबेडकर चौकात रिव्हॉल्व्हर व तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर घटना ही सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली पत्रकार विजय वाघमारे हे … Read more

म्हणून लसीकरणासाठी गर्दी वाढली…! चक्क पहाटेच नागरिक थांबतात रांगेत

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. यात पारनेर, संगमनेर, पाथर्डी व नगर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकजण लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पारनेर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्ण … Read more

‘हे’ आमदार म्हणतात : सर्वसामान्य जनतेत पक्षाचा विचार रुजवा

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कान्हूरपठार गटात राष्ट्रवादी पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेत रुजवून याच विचारसरणीच्या व्यक्तीस निवडून देण्याचे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथे विविध विकासकामाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वडगाव दर्या गावााातील रस्ता, तीर्थथक्षेत्र बायपास रस्ता, दलित वस्ती अंतर्गत,जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी, सभामंडप फरशी बसवणे,अंगणवाडी या विविध … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीनावर ‘या’ दिवशी होणार निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने जामीन मिळण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही कुरतडीकर यांच्यासमोर 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध देऊन व संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील तरूणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपिंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाकीर शाहीन शेख, त्याचा भाऊ निशाद शाहीन शेख, शहाबाज ऊर्फ शहाउद्दीन शेख (सर्व रा. सोनई ता. … Read more

पशुधन धोक्यात…बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील शिंदे मळा रोडवर असलेल्या बाळू चोरमले यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याबाबत अधिक माहिती अशी कि, नुकतेच म्हस्केवाडी येथील कुणाल म्हस्के व … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ ! आमदार लंके यांचे छञपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील जवळा या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमी  जनतेचे आराध्य दैवत  छञपती संभाजी महाराज यांची तुलना ग्रामपंचायत सदस्याशी सोबत केली आहे त्यामुळे तमाम   महाराष्ट्रातील  शिवप्रेमींची  भावना दुखावल्या आहेत आमदार निलेश लंके यांनी पुढील दोन दिवसांत तमाम … Read more

लग्नसोहळे ठरतायत कोरोनाची हॉटस्पॉट…प्रशासनाने घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- पारनेरच्या वाढत्या रुग्ण संख्येला लग्न सोहळे चांगलेच भोवत असल्याचे दिसत आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी तालुका प्रशासनाने लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर करोना चाचण्या केल्या. सोहळ्यास उपस्थितांची चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट काल आले. गेल्या 24 तासात तालुक्यात 158 करोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक लग्नसमारंभात … Read more

पावसाचा जोर ओसरताच धरणाच्या पाणी पातळीतील वाढ थांबली

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  जून महिना कोरडा कोरडा गेल्यानंतर अखेर वरुणराजाने जुलै महिन्यात आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतलावरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कमी झाला असलातरी अजूनही पाण्याची आवक सुरू आहेकुकडी … Read more