…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो. त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो. केंद्रात … Read more

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.

अहमदनगर :- प्रवरा साखर कारखान्यात अभियंता पदावर काम करणाऱ्या केशव कुलकर्णी यांचा संगनमत करुन खून केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करण्यात आला आहे.  अभियंता केशव कुलकर्णी यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता !

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील जेव्हापासून विरोधीपक्षनेते झाले तेव्हा पासून त्यांचे भाजपाशी साटंलोटं असल्याचा आरोप त्यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत या ट्रस्ट ला २०१३-१४ मध्ये दोन कोटी रुपये डोनेशन मिळाले. हे डोनेशन त्यांना झाकीर नाईक नावाच्या अतिरेक्याकडून मिळाल्याचा गौप्य स्फोट राधाकृष्ण् विखे पाटील … Read more

पुत्रप्रेमामुळे अखेर राधाकृष्ण विखे पाटील भाजपात दाखल !

अहमदनगर :- मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय कोंडीत सापडलेले विरोधी पक्षनेतेे राधाकृष्ण विखे यांनी पुत्रप्रेमापोटी अखेर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी मेळ बसवत जुळवून घेतले. मंगळवारी डॉ. सुजय यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयात राधाकृष्ण विखे यांनी शहर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर … Read more

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश?

अहमदनगर :- पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.  त्यासाठी १२ एप्रिलचा ‘मुहूर्त’ ठरला असून  डाॅ. सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभेत हा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दाेघेही … Read more

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेही भाजपवासी होणार ?

अहमदनगर :- ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढील पंधरा दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्तवाहिनीवर बुधवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डाॅ. सुजय नुकताच भाजपत गेला आहे. भाजपने त्याला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विखे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत !

शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीनंतर शिर्डीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव आणि नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय … Read more

…म्हणून संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. बंडाचा झेंडा फडकवत मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे.  भाजपचे नगर … Read more

पुत्र कि पक्ष ? ना.विखे आणि खा. गांधींच्या पक्षनिष्ठेबाबत चर्चा !

अहमदनगर :- पुत्रप्रेमाला किती महत्त्व असते याचे उत्तम उदाहरण बुधवारी रात्री पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे यांनी रात्री उशिरा भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. त्यांचे वडील … Read more

पुत्रप्रेमापोटी राधाकुष्ण विखे खा.दिलीप गांधींच्या भेटीला !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. खासदार दिलीप … Read more

काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे !

अहमदनगर :- जे काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे, असे म्हणत जे उडाले ते कावळे, असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी विखे यांना लगावला. जे सोडून गेले त्यांच्यामुळे नवीन लोकांचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुषार गार्डन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी … Read more

वडील प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख – सुजय विखे पाटील.

मुंबई – भाजप प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच, जे काही करशील ते सांभाळून कर असा वडील म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय विखे म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले … Read more

मुलाने हट्ट केला, तर त्याला समजावण्याची जबाबदारी वडिलांची…

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते आहेत. ते राज्याच्या पातळीवरील आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असल्याने मुलगा भाजपमध्ये जात असताना त्यांनी त्याला रोखायला हवे होते.  दुर्दैवाने तसे घडले नाही. मुलाच्या प्रवेशानंतर आपण विरोधी पक्षनेतेपदावर राहणार आणि पक्ष सांगेल ते करणार, असे ते म्हणत असतील, तर त्यांना ते सिद्ध करावे लागेल. त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे. … Read more

LIVE : सुजय विखेंच्या विरोधात राधाकृष्ण विखे प्रचार करणार नाहीत !

मुंबई :- सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर आज विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमासमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही, माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? – राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसशी माझी बांधिलकी, ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मान्य – … Read more

राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्षनेते पद सोडणार?

अहमदनगर :- सूजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना पक्ष आपल्यासाठी एक जागा मिळवू शकत नसेल तर अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढील भुमिका ठरवावी लागेल, असा इशारा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला दिला आहे.  डॉ.सुजय यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीचे चित्र मतदारांसमोर जाईल. त्यामुळे … Read more

विरोधीपक्षनेत्यांचे चिरंजीव आज होणार ‘भाजपवासी’ !

अहमदनगर :- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्‍चित झाला आहे.  आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास डॉ. सुजय हे त्यांच्या निवडक समर्थकांसह भाजपाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मान्यवर त्यांचे पक्षात स्वागत करतील. या सोहळ्यास विखे यांचे निवडक … Read more

पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ !

अहमदनगर :- डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटलांवर येवू शकते.  ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली होती. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी … Read more

…म्हणून विखे पाटील भाजपात ?

मुंबई :- ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजयला भाजपात पाठवला का? असा टोला शिवसेना प्रवक्ता डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ‘राधाकृष्ण विखे … Read more