कोरोना रोखण्यासाठी गृहिणींनी पुढाकार घ्यावा

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृहिनींनी पुढाकार घेऊन कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी केले. राहाता नगरपालिकेत हळदी-कुंकू समारंभ तसेच माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जन जागृती या कार्यक्रामात पिपाडा बोलत होत्या. राहाता नगरपालिकेत नगरपालिका अंतर्गत हळदी कुंकू समारंभ तसेच माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचांना कोरोनाची लस द्या !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- आरोग्य सेवक, पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविषयी शासनाचे सूचना व निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून कोरोना महामारीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या सरपंचांना कोरोनाची लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी राहाता तालुक्यातील खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे यांनी केली आहे. यासंदर्भात पत्रकात मुरादे यांनी … Read more

शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सव्वातीन लाख लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच राहता तालुक्यातील एका रिटायर्ड शिक्षकाच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरटयांनी बंद खोलीचे कुलूप व कोंयडा तोडून 3 लाख 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत … Read more

वर्षनुवर्षे अतिक्रमीत रस्ता प्रशासनाच्या मध्यस्तीने झाला खुला

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील दुर्गापूर व संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथील वर्षानुवर्षे अतिक्रमण झालेला सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता पाच दिवसांपासून खुला करण्यात आला आहे. दरम्यान हा रस्ता खुला करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील यंत्रणेमार्फत प्रयत्न चालू होते. अखेर ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ अंतर्गत तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, … Read more

घरफोडी: सव्वा तीन लाखांची रोख रक्कम लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे  कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात घुसून टेबलाच्या कप्प्यात ठेवलेले तब्बल ३ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केले. ही घटना राहाता  तालुक्यातील माळी नगर परिसरात घडली.याबाबत दगडू मारुती वाघे यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी वाघे हे राहाता तालुक्यातील … Read more

गोदावरीच्या आवर्तनाचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटलांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला २१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्­याची माहिती माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबतचा पाठपुरावा त्यांनी जलसंपदा विभागाकडे केला होता. या आवर्तनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याबाबत आमदार विखे पाटील यांनी पत्रकात … Read more

20 फेब्रुवारीला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- 20 फेब्रुवारी ला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार आहे. सुरुवातीला पिण्यासाठी पाणी तलावात सोडले जाणार आहे. त्यानंतर सिंचनाचे आवर्तन सुरु होईल. शिर्डी मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आवर्तन वेळेत सोडावे यासाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार राहाता व कोपरगाव तालुक्यातील शेतीसाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी पहिले सिंचनाचे आवर्तन येत्या … Read more

विखे कुटुंब हेच आमचा पक्ष!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- आमचे कुटुंब व माझे वडील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील आम्ही आमचे नेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील या गटाचे असून, आमचा पक्ष हा विखे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम केले आहे आणि पुढेही करू. तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हा बँकेत पारदर्शक कारभार करणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत … Read more

व्यापाऱ्याला चोप देत चोरटयांनी रोकड लुटली

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी बदलले मात्र परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर बनत चालली आहे. आता या चोरट्यांना लगाम लावणार कोण ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात … Read more

कौतुकास्पद ! शेतकऱ्याचा पोऱ्या झाला पोलीस अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- जिद्द, चिकाटी, अपार मेहनत या गोष्टींवर भर दिली कि मिळणाऱ्या विजयापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे या गावचे शेतकरी कुटुंबातील अंकुश सुभाष डांगे यांनी युपीएससी परीक्षेत भारतात 97 क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. अंकुश डांगे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली आहे. … Read more

महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक; वीजपुरवठा केला खंडित

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. यातच राहता तालुक्यात वीजबिल वसुली मोहीम सुरु झाली आहे. महावितरणने येथील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गहू, हरबरा, जनावरांच्या चार्‍याची पंचायत होण्याची शक्यता असून अधिकार्‍यावर वरिष्ठ स्तरातून वसुलीचा दबाव वाढत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या,परिसरात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेने सावळी विहीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सादर कुटुंब हे गरीब असून मुलीचे आई वडील मोल मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी मोठी बहीण व लहान … Read more

कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी महिलाराज

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- मागील महिन्यात बिनविरोध झालेल्या कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवेदिता दिलीप बोरुडे यांची तर उपसरपंचपदी सविता गोरक्ष खर्डे यांची – बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदावर आता महिला आल्याने ::. आता कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीवर महिलराज अवतरणार आहे. सलग तिसऱ्या वेळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्डे-विखे एक्सप्रेस धावली. तूर्तास अँड. सुरेंद्र खर्डे … Read more

या ठिकाणी सरपंचपदी महिलांचे वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. तसेच निवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले आहे. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार? दरम्यान नुकतेच काही ठिकाणी सरपंच पदांची घोषणा करण्यात आल्या आहेत. राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी जाहीर कारण्यातआल्या आहेत. यामध्ये 13 … Read more

वीज जोडणीसाठी घेतली ४५०० रुपयांची लाच वीज कर्मचारी’एसीबी’च्या जाळ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देण्यासाठी तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज कंपनीच्या असिस्टंट लाईनमनला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. यात नवनाथ नामदेव निर्मल, (वय ४३, धंदा -सहायक तंत्रज्ञ, (असिस्टंट लाईनमन) ( रा. अस्तगाव रोड, पिंप्री निर्मळ ता. राहाता) … Read more

उर्जा राज्यमंत्री जिल्ह्यातील तरी नागरिकांवर आंदोलनाची वेळ येतेय

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- भारतीय जनता पक्षाच्यावतीने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करून शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण … Read more

स्वीकृत नगरसेवकाने दिला राजीनामा,म्हणाले सभागृहात पाच मिनिटात…

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राहाता नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक साहेबराव निधाने यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक विजय सदाफळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गटनेते विजय सदाफळ यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक साहेबराव निधाने यांनी म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये राहाता नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्यपदी जनविकास आघाडीकडून मला … Read more

बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने नागरिक भयभीत !

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील ममदापूर यादवमळा परिसरातील टिळेकर व कदम वस्तीवर बिबट्याचा वावर वाढला असून बुधवारी रात्री पुन्हा बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. ममदापूर पासून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रोड लगत असणाऱ्या टिळेकरवस्ती परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत असून अनेक पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या आहे. संदेश … Read more