डॉ. विखेंचा जयंतीदिन शेतकरी दिन म्हणून होणार साजरा

लोणी : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्­हणून साजरा करण्­याचा निर्णय राज्­याच्­या कृषि, पशुसंवर्धन, दुग्­ध व्­यवसाय, विकास व मत्­सव्­यवसाय विभागाने घेतला आहे. डॉ. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरीता केलेल्­या कार्याचे स्­मरण व्­हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्­मान म्­हणुन नारळी पौर्णिमेच्­या दिवशी असलेला त्­यांचा जन्­मदिवस हा शेतकरी दिन … Read more

विद्यार्थ्यांनी बनविलेली कार“स्टुडन्ट कार्ट डिझाईन चॅलेंजेस” या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अव्वल

हैद्राबाद :- येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या देशपातळीवरील मानाच्या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार दाखल झाली असून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कार माँडेल बद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली. कार तयार करण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक कराताना … Read more

विधानसभा निवडणुकीआधी अहमदनगर जिल्हा विभाजन करा अन्यथा….

राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्­नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष … Read more

विखे कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले !

पारनेर :- विखे साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे सत्तर कोटी थकवले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांचे बंधू व प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक विखे यांनी केला. राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील संस्थांत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात डॉ. अशोक विखे साेमवारपासून लोणी येथे उपोषणास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अर्धा … Read more

गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला गुंडांकडून लाकडी दांडक्याने मारहाण.

राहाता :- गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार-पाच गुंडांनीच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी नगर-मनमाड महामार्गावर घडली. रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एका गुंडाला पकडून ठेवले. आठवडे बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात. पिंपळवाडी येथे वीटभट्टीवर काम करणारा मजूर मंजित केवट (मूळ उत्तर प्रदेश) हा आठवडे बाजारासाठी राहात्याला आला होता. बाजार करताना त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने … Read more

दुधाच्या बिलाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आश्वी :- खासगी दूधसंघाला घातलेल्या दुधाच्या बिलाची रक्कम वारंवार तगादा करूनही डेअरी मालकाने देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील रहिमपूर येथे घडली आहे. नितीन शिंदे (वय २८, रा. रहीमपूर, ता. संगमनेर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन शिंदे हे शेतकरी असून आपल्या घरचे संकलित दूध एका खासगी दूध डेअरीला देत होते. यापोटी … Read more

अवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.

राहाता :- अवजड वाहतुकीमुळे राहाता व अस्तगाव माथ्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर एकजण जखमी झाला. गुरूवारी रात्री सातच्या सुमारास कोपरगाव नाक्याजवळ संजय छबू गिधाड (राहाता) बाजार करून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला उभा असताना नगरहून शिर्डीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकची (युपी ७७ एएन ५८०४) त्याला धडक बसली. तो गंभीर जखमी झाले. शिर्डी … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल.

राहाता :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अस्तगाव येथील दोन जणांविरोधात राहाता पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राहाता पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, अस्तगावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले होते. आरोपी राजेंद्र रतन वाणी व इंद्रभान भाऊसाहेब गव्हाणे यांनी पीडित मुलीच्या राहत्या घरात पीडित मुलगी आणि तिची बहीण घरात एकट्याच असल्याचा … Read more

वाकड्यात शिरणे हीच ‘विखे’ परिवाराची परंपरा !

संगमनेर :- संगमनेरचा विकास हा शेजारच्यांना पाहवत नाही. कुटनीतीचा वापर करून विकास कामांमध्ये आडकाठी निर्माण करणे व वाकड्यात शिरणे ही विखेंची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाषराव सांगळे यांनी दिले डॉ. सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आ. थोरातांवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या … Read more

महाविद्यालयीन युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू.

राहाता :- हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. ही घटना राहाता शहरातील पंधरा चारी भागात शुक्रवारी दुपारी घडली. सायली विजय सदाफळ ही विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. शुक्रवारी दुपारी हरभरा खाण्याकरिता ती शेतात गेली होती. हरभरा घेतल्यानंतर तो धुण्याकरिता त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यावर ती गेली. हरभरा धुताना … Read more

वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा केला खून.

राहाता :- तालुक्यातील शिंगवे गावात वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रज्जाक बशीर शेख (वय ६०) हे गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पुतण्या मोहसीन यासीन शेख तेथे आला. वडिलोपार्जित शेतीच्या वादातून त्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्याराने पाठीत व डाव्या हाताच्या मनगटावर वार … Read more

मटनात विष कालवून नवऱ्याची हत्या करणाऱ्या बायकोला अटक !

राहाता :- सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त बायकोने जेवनात विष कालवून त्याला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील साकुरी गावात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,साकुरी गावातील सुनिल बंन्सी बनसोडे व पत्नी मिना सुनिल बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र सुनिल नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याचाच राग … Read more