रोहित पवारांची कर्जत तालुक्यात जमीन खरेदी !

अहमदनगर :- खासदार शरद पवार यांचे नातू आणि कर्जत – जामखेड तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले रोहित पवार यांनी नुकतीच पिंपळवाडी येथील उमा महेश्वरी राजा प्रकाश यांच्याकडून दीड हेक्टर जमीन खरेदी केली. रोहित यांचे सासरे मगर परिवार यांची कर्जत तालुक्यामधील पिंपळवाडी येथे २०० एकर शेतजमीन आहे. आता स्वत: पवार यांनीही तेथे जमीन घेतली … Read more

रोहित पवार यांच्याकडून कर्जत – जामखेड परिसरातील तरुणांसाठी नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दुष्काळी भागातील कर्जत- जामखेड या तालुक्यांमधील युवक- युवतींसाठी येत्या ३० ऑगस्ट, २०१९ रोजी भव्य सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळावा होणार असून या मेळाव्यात राज्यातील नामवंत बड्या कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात कंपन्याचे अधिकारी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. रोहित पवार हे … Read more

कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी

कर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. … Read more

रोहित पवार यांच्या ‘सृजन तर्फे कर्जत मध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा !

कर्जत :- रोहित पवार यांच्या ‘सृजन’ या संस्थेच्या वतीने कर्जत-जामखेड परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  कर्जत तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही स्पर्धा होणार आहे.  18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार असून 18 तारखेला कर्जत आणि जामखेड … Read more

रोहित पवारांचा धसका घेतल्याने पालकमंत्री शिंदेना मतदारसंघ सुटेना….

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे. भाजप सरकार मध्ये मंत्री असूनही राज्यातील पूरग्रस्त भागात जाणे त्यांनी टाळले असून मतदार संघातच राहणे पसंत केले आहे.  कर्जत जामखेड मतदारसंघात कमी वेळ देणारे मंत्री शिंदे निवडणुका जवळ येताच मतदारसंघात रमायला … Read more

राज्यातील पूर परिस्थिती बाबत रोहित पवारांची भावनिक पोस्ट

अहमदनगर :- राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूर परिस्थिती बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी लिहिलेय कि ”जेव्हा जेव्हा मी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात येतो तेव्हा इथे असणाऱ्या नद्या आणि या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक संपन्नतेच कौतुक वाटतं. पण कालपासून या … Read more

पूरग्रस्त भागातील लोकांना सर्व प्रकारे मदत करणार : रोहित पवार

कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्‍न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले. कर्जत तालुक्‍यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्‍यातील खेड, औटेवाडी, … Read more

सलूनवाल्याच्या हट्टापायी रोहित पवारांनी केली शेव्हिंग !

जामखेड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारी असणाऱ्या सलूनमध्ये केसांची कटींग करत शेव्हिंग केली. जामखेड येथील … Read more

ह्या कारणामुळे रोहित पवार लढविणार कर्जत – जामखेड मधून निवडणूक…

अहमदनगर :- राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकत या निर्णया मागील कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे. याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. … Read more

रोहित पवारांना कर्जत जामखेड मध्ये कॉंग्रेसकडून ‘नो एंट्री’ !

अहमदनगर :- कर्जत-जामखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी न सोडण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झाला आहे. ह्या जागेवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढण्यास इच्छुक आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पवारांची अडचण होणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच जागा असून शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर व कर्जत-जामखेड अशा या … Read more

रोहित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादीतील राजकारण तापणार

जामखेड :- आगामी काळात कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाचा रोहित पवार यांना विरोध असून एका गटाचा पवारांशिवाय पर्याय नसल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या ठिकाणी पवार यांच्याऐवजी स्थानिकांना संधी मिळावी, असा राष्ट्रवादीच्या एका … Read more

पालकमंत्री राम शिंदेनी घेतला पवारांचा धसका,विधानसभेची तयारी सुरु !

जामखेड प्रतिनिधी :-शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेनंतर आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवधी असतानाच पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. याचे कारण म्हणजे कर्जत, जामखेड तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शरद पवार यांचे नातू … Read more