कोरोनाविरुद्धच्या लढाईत नामदार शंकरराव गडाख यांनी घेतलेला ‘हा’ निर्णय वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. मंत्री गडाख यांनी पत्रात लिहले आहे,देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव … Read more

सगळ्यांना बरोबर घेऊन ही विकासाची गंगा आपण अविरत पुढे नेणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : यशापयशाचा विचार न करता गोरगरीब, शेतकरी व समाजासाठी काम कसे करत रहावे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मंत्री शंकरराव गडाख असल्याचे प्रतिपादन देवगडचे भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी केले.मंत्री म्हणून काम सुरू करण्यापूर्वी गडाख यांनी श्रीक्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर व टोका येथील बालब्रह्मचारी महाराजांकडे जाऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. देवगड येथील … Read more

वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ घालविणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे यांना मंत्रिपदाने कायमच हुलकावणी दिली. मात्र या दोघांचेही मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केले.  राहुरीला ७० वर्षांनंतर बापूसाहेबांचे चिरंजीव प्राजक्त आणि नेवाशाला पहिल्यांदाच यशवंतरावांचे सुपुत्र शंकरराव यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, मुलांना मिळालेल्या लाल दिव्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पाहिलेले … Read more

मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे :- स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदा ना. शंकरराव गडाख यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या रुपाने नेवासा तालुक्याला न्याय मिळालेला आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा नेवासा तालुक्याचा मंत्रिमंडळात समावेश झालेला असून त्याचा आनंदच आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी होऊन एवढे मोठे पद मिळणे कठीणच असते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शंकरराव गडाख … Read more

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – आ. गडाख

नेवासा :- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे आठ दिवसात सरसकट पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, नेवाशाचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.  गुरुवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. त्यात सेनेला पाठिंबा दिलेले आमदारही होते. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान … Read more

आमदार शंकरराव गडाखांसमोर ‘हे’ नवे आव्हान

नेवासे :-  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ ते २०१९ या काळात नेवासे मतदारसंघासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत बाराशे कोटींचा निधी आणून प्रत्येक गावातील पायाभूत सुविधांचा विचार करून रस्ते, पाणी, वीज, सभामंडपासाठी पैसे दिले.  यापेक्षाही मोठे काम करण्याचे आव्हान आमदार शंकरराव गडाख यांच्यासमोर आहे. नेवासे हे मोठे धार्मिक अधिष्ठान मानले जाते. श्रीक्षेत्र नेवासे, देवगड, शनिशिंगणापूर … Read more

जनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख

सोनई : विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीने दिलेला त्रास मी विसरलो आहे. आपली राजकीय ताकद विरोधकांची जिरविण्यासाठी अजिबात खर्ची घालणार नसून जनतेच्या हितासाठी राबविणार असल्याचा दृढ संकल्प नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. विजयी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी वरील भावना व्यक्त केली. विजयानंतर त्यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद … Read more

नेवाशात ‘जयहरी’ का ‘जय क्रांतिकारी’?

नेवासा – संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या नेवासा विधानसभा मतदार संघात मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला देणार धक्का? असा सवाल मतदार संघात उपस्थित केला जात असून उद्या नेवासा मतदार संघात ‘जयहरि’ का ‘जय क्रांतिकारी’ चा जयघोष होतो याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.  नेवाशात दोन्ही उमेदवारांनी अटीतटीने निवडणूक लढवली. त्यामुळे गडाख – मुरकुटे समर्थकांकडून विजयाचा दावा … Read more

आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे!

बेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.  अशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून … Read more

Vidhansabha 2019 – आ. मुरकुटे हसले तर गडाख कोमजले!

नेवासा – नेवासा मतदार संघात दररोज चित्र बदलत असल्याने जिल्ह्याचे इकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रारंभी येथे वरवर माजी आ. गडाखांचे पारडे जड वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा देवून मतविभाजन टाळले खरे, मात्र यातून गडाखांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.  असे असतानाही घुलेंच्या निवासस्थानी जावून गडाखांनी त्यांची घेतलेल्या भेटीमुळे आ. मुरकुटेंची झोप उडाली. मात्र, काही तासातचं जि. … Read more

गडाखांच्या बालेकिल्ल्यात आ. मुरकुटेंचे शक्तीप्रदर्शन

नेवासे –माजी आमदार शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला असलेल्या सोनईत भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सोमवारी काढलेल्या प्रचार रॅली काढली. यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा सहभागी झाले होते. मागील निवडणुकीत सोनईत मुरकुटे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. पाच वर्षांनी भाजपने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दोन महिन्यांपूर्वी सोनईमध्ये पाणीटंचाई असताना … Read more

मुरकुटेंनी तालुक्याचे वाळवंट केले : गडाख

नेवासे: माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केले. आधी सभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्याचे वाळवंट केल्याचा आरोप शंकररावांनी या वेळी केला. पक्षाच्या झेंड्याखाली काम करताना मर्यादा पडत असल्याने अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे सांगत मुरकुटे यांच्या … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more

माजी आ. शंकरराव गडाख ‘या’ पक्षाकडून लढणार विधानसभा !

नेवासे : माजी आ. शंकरराव गडाख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘क्रांतिकारी’ पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते, विशेष म्हणजे युवा नेते प्रशांत गडाख मांडवाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत बसले होते. यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी ‘राजकीय पळापळ’ करणार्‍यांची खिल्ली उडवली, तसेच वरुन किर्तन आतून तमाशा न करण्याचं आवाहनही … Read more

भाजपकडून निवडणूक लढवणार नाही – माजी आमदार शंकरराव गडाख

नेवासा : मी कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार या चिंतेने पछाडलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनाच भाजपची उमेदवारी लखलाभ होवो. मी कधीही भाजपकडून उमेदवारी करणार नाही, असे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत व जि. प. सदस्य सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी गडाख रविवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जबाजी फाटके … Read more

‘त्या’ प्रकरणात गडाखांना न्यायालयाकडून जामीन

नेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी ३१ ऑगस्ट रोजी उपस्थित राहाण्यासाठी न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिलेला होता. गडाख यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याप्रकरणी न्यायालय त्यांच्याबाबतीत कोणती भूमिका घेते, किंवा त्यांना … Read more

त्यांच्या अभद्र युतीने शेतकऱ्यांची फसवणूक – मा.आमदार शंकरराव गडाख

नेवासे :- मागच्या वर्षी शासनाने गंभीर दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नेवासे घेतला. खरीप व रब्बी हंगामात दुष्काळाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खरिपासाठी कर्ज काढले. मात्र, पिकं सुकून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मशागतीचा खर्च वसूल झालाच नाही, कर्जाचा बोजा मात्र झाला. विम्याची भरपाई मिळेल एवढीच आशा असताना कंपनीने अंगठा दाखवल्याने शेतकरी हतबल होण्याची … Read more

नेवाश्यात पुन्हा गडाख किंग, आमदार मुरकुटेंच्या अडचणी वाढल्या

नेवासे : पंचायत समितीच्या सोनई गणाची पोटनिवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी झाली. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कारभारी डफळ यांनी भाजपच्या प्रकाश शेटे यांचा ३२८९ मतांनी दारुण पराभव केला. भाजपचा धुव्वा उडण्यास आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे खापर फोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणींत वाढ होणार आहे.  नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी मराठा, … Read more