खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा … Read more

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली ही मागणी 

अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले सहनशीलतेचा अंत पाहू नका !

अहमदनगर : सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. त्यामुळे नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी सुयोग्य करावेत. संबंधित सर्व विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावे व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी कानउघडणी खा.डॉ.सुजय विखे पाटील … Read more

राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे…..

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली. उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. … Read more

आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू !

अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब … Read more

महा’शिव’आघाडी बद्दल खा. सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे. त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय … Read more

शिवसेनेचा बहिष्कार ग्राह्य धरू नये : खा. विखे

पारनेर : पारनेर तालुका दौऱ्यावर तालुक्यातील शिवसेनेने टाकलेला बहिष्कार हा अधिकृत नसल्याने तो ग्राह्य धरू नये, अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. विखे यांच्या तालुका दौऱ्यावर तालुक्यातील शिवसेनेने बहिष्कार टाकला होता, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली असता, शिवसेनेचा बहिष्कार अधिकृत पत्रानुसार नसल्याने ग्राह्य धरू नये तसेच शिवसेनेने पदाधिकारी हे एक तर … Read more

नुकसानग्रस्तांना महिना अखेर पर्यंत भरपाई दिली जाणार – खा. विखे

टाकळी ढोकेश्वर: चालू नोव्हेंबर महिन्याच्या आत पारनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानासह रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन खा. डॉ. सुज़य विखे यांनी शेतकऱ्यांना दिले. अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी खा. विखे हे पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. खा. विखे यांनी तालुक्यातील भाळवणी, वासुंदे, कर्जुले हर्या येथील अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी केली, या वेळी … Read more

पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप !

पारनेर :- पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याची खरमरीत टीका खासदार सुजय विखे यांनी बुधवारी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल … Read more

उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू – खा. डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात. त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू … Read more

खासदार डॉ. सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

साकुरी : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्य कै. नारायण गाडेकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते आले होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येऊन सरकारकडून जलदगतीने भरपाई कशी … Read more

नगरच्या उड्डाणपुलाबाबत आनंदाची बातमी

अहमदनगर- ’नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून भूसंपादनावरून काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत,’ तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही लवकरच सुरु होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांनी … Read more

12 – 0 च्या अपयशावर खासदार डॉ.सुजय विखे म्हणतात ….

अहमदनगर :- जिल्ह्यात 12-0 हा नारा उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता. पण आम्हला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही.अपयश का आले ? याची कारणे शोधले जातील.आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सर्वांना गरज आहे. या निकालापासून मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. एक ते दोन महिन्यात जिल्ह्यातील अपयशाचे सर्व कारणे शोधले जातील असे खासदार डॉ.सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. … Read more

कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही…’

श्रीरामपूर – ‘श्रीरामपुरातील आता जसे राजकारण सुरू आहे तसेच चालू राहू द्या डिस्टर्ब करु नका.. पण श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच डिस्टर्ब झालो आहे… श्रीरामपुरात कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही… ‘अशा शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली.  त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जोरदार साथ दिल्याने सभेचा नूर बदलून … Read more

भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा -खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर – येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघाचे रस्त्याचे प्रश्न असो किंवा सर्वात महत्वाचा पाटपाण्याचा प्रश्न असो त्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकार पक्षाचे आमदार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा, असे आवाहन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले. श्रीरामपुरात काल … Read more

राष्ट्रवादीचा सुपडासाफ होईल : खा. सुजय विखे

शेवगाव : राज्याच्या १५ वर्षामध्ये हजारो कोटीचे भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे राष्ट्रवादी कॉग्रस सरकार आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या वेळी शेतकरी आणि पाणी प्रश्नावर काम करण्यास सुरवात केली मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीला तीस पेक्षा जास्त जागा मिळणार नसून त्यांचा सुपडासाफ होईल, असा प्रबळ दावा खा. सुजय विखे यांनी केला. महायुतीचे उमेदवार आ. मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ … Read more

पापाची फेड करण्याची वेळ आली : खासदार डॉ. विखे

राहुरी ;- राष्ट्रवादी काँग्रेस ही व्हाॅटस् एपची लाभार्थी झाल्याने सभेला भाडोत्री माणसे आणण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली, असा टोला खासदार डाॅ. सुजय विखे यांनी लगावला. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ रविवारी नवीपेठेत आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी शिवाजी सोनवणे होते. ईडीची चौकशी लागली त्यांना मोकाट सोडायचे, असा सवाल करत केलेल्या पापाची फेड करण्याची … Read more

माझ्या बोलण्याचा विपर्यास करून माझी बदनामी – डॉ. सुजय विखे

तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप … Read more