निष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम !

श्रीगोंदा :  भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस आघाडीचे काम करण्याचा निर्णय करणार असल्याचे निष्ठावंत भाजप पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची  शहरातील बालाजी मंगल कार्यालयात बैठक झाली . त्यात … Read more

जनतेला स्वप्ने दाखवणारे विखे पाटील २३ मार्चनंतर गायब होतील !

अहमदनगर :- ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार? या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले. पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला. जेऊर बायजाबाई … Read more

सुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या त्या तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ !

अहमदनगर :- लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास … Read more

सुजय विखेंच्या पत्नीचाही भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सुचक या आहेत. सौ. धनश्रीताईंनी देखील भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नगर लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल … Read more

‘त्या’फोटोमुळे सुजय विखे नेटीझन्सकडून ट्रोल…व्हायरल फोटोमुळे सुजय विखेंविरोधात नाराजी !

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य व राहूरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शिवाजी गाडे पाटील यांचे मंगळवार दि.२ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. निधनानंतर त्यांचे पार्थिव देह अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या दु:खद प्रसंगी डॉ.विखे पार्थिव देहाच्या अंतिमदर्शन घेण्यासाठी पोहचले. अंतिम दर्शन घेतांना विखे यांनी हार अर्पण करतांना काढलेला फोटो सर्वत्र व्हायरलं झाला आहे. श्रद्धांजली देतांना … Read more

जावयाला सोडून आ.शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत !

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते. दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तीन उमेदवारी भरले. ही निवडणूक … Read more

हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या डॉ.सुजय विखेंकडे स्वतःची गाडी नाही !

अहमदनगर :- हेलिकॉप्टरमधून फिरणारे उमेदवार म्हणून ओळख असणारे सुजय विखे यांच्याकडे प्रत्यक्षात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून या वेळी त्यांनी २८ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. डॉ. सुजय विखे हे कोट्यधीश असले तरी त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर एकही गाडी नाही. उमेदवारी अर्ज भरताना … Read more

सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार आहेत. ही सभा सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारच्या मैदानावर होणार आहे. या मैदानाची पोलिस प्रशासनाने पुन्हा पाहणी केली. मोदी यांच्या सभेसाठी झेड प्लस सिक्युरिटी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य असल्याने तेथे सभा घेण्याचे नियोजन … Read more

डॉ.सुजय विखे आहेत ‘इतक्या’ कोटीचे मालक !

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या अर्ज दाखल केला. ते 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत.  तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. विशेष म्हणजे सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. मात्र त्यांच्या पत्नी धनश्री विखेंकडे प्रवरा बँकेचे 26 लाख … Read more

खासदार होवू पहाणाऱ्या सुजय विखेंची उमेदवारी अर्ज भरताना फजिती !

अहमदनगर : भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच फजिती झाल्याचा प्रकार घडला. पहिल्यांदा अर्ज दाखल करताना ऐनवेळी अर्ज पाठीमागेच राहिल्याने सुजय विखे संतापल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आले होते. भाजप चे तीन मंत्री, तीन … Read more

उमेदवारी अर्ज भरताना सुजय विखे पाटील भावूक…

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे पाटील आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विखे भावूक झाले. तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आईवडिलांच्या आठवणीने ते भावूक झाले. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले हेच माझे आईवडील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी उमेवारी अर्ज दाखल केला. दिल्लीगेट पासून पायी रॅली काढून सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. डाॅ.सुजय विखे पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, … Read more

संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यावर काय केले, याचा हिशोब द्यावा !

अहमदनगर :- ‘मी स्वकर्तृत्वावर निवडणुकीत उतरलो आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा असताना नगरच्या जागा यांनी प्रतिष्ठेची केली. मात्र, पवार यांना विखे कुटुबांबद्दल असलेला द्वेषामुळे काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली नाही. माझ्या पराभवासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात हे नगरमध्ये येऊन थांबले होते. माझे आव्हान आहे, की आणखी कोणी असतील तर त्यांनाही आणा. जनता त्यांना मतपेटीतून निकाल … Read more

दिलीप गांधी सुजय विखेंचा प्रचार करणार ?

अहमदनगर : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. नगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. त्यानंतर आज स्वत: सुजय विखे पाटील यांनी … Read more

माजीमंत्री पाचपुतेंकडून सुजय विखेंसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणावळीचे नियोजन !

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विजया साठी शुक्रवारी (२९ मार्च) कार्यकर्ता मेळावा व जेवणावळीचा कार्यक्रम काष्टीमध्ये आयोजित केला आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी भाजपच्या गोटात दिसत आहेत. डॉ. विखे हे लोकसभेची ३ वर्षांपासून तयारी करत असल्यामुळे त्यांचा श्रीगोंद्यामध्ये मोठा जनसंपर्क … Read more

विखे पाटलांकडून पैशाच्या जोरावर कार्यकर्ते खरेदी करण्याचा प्रयत्न !

जामखेड :- तालुक्यातील कोणत्या कार्यकर्त्याची आर्थिक किंमत किती आहे, कोणाला किती पैसे द्यावे लागतात, असे विचारत पैशांच्या जोरावर माणसे खरेदी करण्याची भाषा दोन वर्षांपासून या मतदारसंघात केली जात आहे, असा आरोप लोकसभा निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यावर केला. राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी शहर व तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी … Read more

सुजय विखेंविरोधात सुवेंद्र गांधी ‘सुपरफास्ट’ !

अहमदनगर :- खा.दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करण्याची घोषणा केल्यानंतर मतदारसंघातील गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही झाले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर सुवेंद्र आजही ठाम आहेत. उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाच्या विखेंचे काम कसे करायचे अशा शब्दांत ते मतदारसंघातील … Read more

पुत्रप्रेमापोटी राधाकुष्ण विखे खा.दिलीप गांधींच्या भेटीला !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. खासदार दिलीप … Read more