लोकसभा निवडणूक लढवली, तरच माझा प्रपंच चालेल असे नाही – सुजय विखे

अहमदनगर :- तुमच्याकडे गाड्या किती आहेत, हे कोणालाही ऐकायचं नाही. गाड्या कशा आल्या, पैसे कुठून आले हे मी आता सांगणार नाही.  गाड्या हे जर लोकसभेसाठी निकष असतील, तर मीही दहा गाड्या घेतो अशी फिरकी घेत डॉ.सुजय विखे यांनी आ.संग्राम जगताप यांची फिरकी घेतली. लोकसभा निवडणूक लढवली, तरच माझा प्रपंच चालेल असे नाही. ते म्हणतात, धनशक्ती … Read more

राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती – आ.शिवाजी कर्डिले .

अहमदनगर : नगर जिल्ह्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी स्पष्ट केलं आहे. नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ.संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे … Read more

लग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या !

पारनरे :- तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत. येत्या 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं … Read more

सुजय विखेंविरोधात खा. शरद पवारांकडून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र !

अहमदनगर :- राजकीय आखाड्यातील पट्टीचे वस्ताद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी काल सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास सलग प्रदीर्घ बैठक घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेल्या बैठकीत थेट तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी हितगुज केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीतील स्थिती, एकूण मतदान, सध्याचे वातावरण अशा गुजगोष्टी करत लोकसभा निवडणुकीचा संग्राम जिंकण्यासाठी आघाडीचा धर्म … Read more

निष्ठावंत भाजप कार्यकर्ते डॉ. सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर.

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.  डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली.  या पार्श्वभूमीवर गांधी यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष … Read more

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले.  जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.  नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: … Read more

काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे !

अहमदनगर :- जे काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे, असे म्हणत जे उडाले ते कावळे, असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी विखे यांना लगावला. जे सोडून गेले त्यांच्यामुळे नवीन लोकांचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुषार गार्डन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी … Read more

डॉ.सुजय विखे पाटील याना भाजपची उमेदवारी जाहीर !

अहमदनगर :- भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे.अहमदनगर मधून डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप च्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार नंदुरबार – हीना गावितधुळे – सुभाष भामरेरावेर- रक्षा खडसेअकोला – संजय … Read more

वडील प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख – सुजय विखे पाटील.

मुंबई – भाजप प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच, जे काही करशील ते सांभाळून कर असा वडील म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय विखे म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले … Read more

शिवसेना नगरसेवकांचे सेल्फी विथ ‘सुजय’ !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी मुंबईहून नगरला आल्यानंतर आधी शिवसेनेचे शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेतली. राठोड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला असल्याने त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, असे विखेंकडून स्पष्ट करण्यात आले व त्याला राठोडांनीही दुजोरा दिला.  राठोडांच्या घरी गेल्यानंतर डॉ. विखेंना घेऊन राठोड गांधी मैदानाजवळील लक्ष्मीबाई चौकात … Read more

भाजप प्रवेश झाला आता सुजय विखेंसमोर आहे ‘हे’ आव्हान.

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा मतदार संघात डॉ. विखेंना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी शहर भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातून मोठे मताधिक्य मिळवण्याचे आव्हान डॉ. विखेंसमोर असणार आहे. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधून डॉ. विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप उघड नाराजी व्यक्त केली जात नाही. उलट युवा नेतृत्व असलेल्या सुजय … Read more

वाचा काय म्हणाले सुजय विखे भाजप प्रवेश करताना….

मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील मला भाजपमध्ये प्रवेश दिला त्याबदल्ल सर्व नेत्यांचे आभार – सुजय विखे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय पाहता, मोदींच्या प्रभावातून माझ्यासह युवकांनी भाजपमध्ये प्रवेश – सुजय विखे पाटील माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय … Read more

LIVE UPDATE : सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश.

मुंबई :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. माझ्या वडीलांच्या इच्छेविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपात येण्याची ही भूमिका ही सुजय विखे पाटील याची वैयक्तिक भूमिका आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी … Read more

डॉ . सुजय विखेंना भाजपचे ‘ टेन्शन ‘

अहमदनगर :- डॉ . सुजय विखे यांना भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच टेन्शन मध्ये असल्याचे दिसून आले . विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे.  त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक आहे . विखेसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली.  नगरजवळील विळद घाट येथील विखे यांच्या कार्यालयात डॉ … Read more

डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी नकोच !

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांना भाजपमधून उमेदवारी देण्यास शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे.  सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विखेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.  त्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी नगर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर तब्बल चार वेळा चर्चा केली. चर्चेत … Read more

विरोधीपक्षनेत्यांचे चिरंजीव आज होणार ‘भाजपवासी’ !

अहमदनगर :- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्‍चित झाला आहे.  आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास डॉ. सुजय हे त्यांच्या निवडक समर्थकांसह भाजपाच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात पक्ष प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मान्यवर त्यांचे पक्षात स्वागत करतील. या सोहळ्यास विखे यांचे निवडक … Read more

सुजय विखे भाजपमध्ये गेल्याने काहीही फरक पडणार नाही – शरद पवार.

अहमदनगर :- लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. डॉ. सुजय विखे यांचे आघाडीत काहीही योगदान नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्याने काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. पूर्वी गाजलेल्या एका निवडणुकीचे उदाहरण देऊन विखेंचा पराभव होऊ शकतो हे सांगताना त्यातून उदभवलेल्या खटल्याची आठवणही पवारांनी सांगितली. पुण्यातील … Read more

पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ !

अहमदनगर :- डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटलांवर येवू शकते.  ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली होती. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी … Read more