राज्यात पुन्हा फडणवीस सरकार!

मुंबई : राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच पूर्ण बहुमताचे सरकार येईल आणि त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका जाहीर सभेत दिली. या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचाच असेल, असे सांगत प्रचाराचे रणशिंग फुंकले. भाजपाने घटनेचे कलम ३७० … Read more

पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं !

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता – … Read more

पिचडांना शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक, सेनेसह भाजप नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

अकोले :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे … Read more

‘त्या’ गुंडांना जशास तसे उत्तर देणार : माजी महापौर अभिषेक कळमकर

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्ता मेळावा आटोपून जात असताना काही गुंडांनी मला धक्काबुक्की करत अंगावर चपला फेकण्याचा प्रकार केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास त्या गुंडांची गुंडगिरी खपवून घेणार नसून त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रभर … Read more

आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर ! भरचौकात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर…

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बँक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे … Read more

झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या … Read more

भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणतात रोहित पवारांच्या कामाने मी प्रभावित झालो!

जामखेड :- पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपला सोडचिठ्ठी दिली. तसेच ते येत्या २३ तारखेला कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद … Read more

काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल !

संगमनेर :- काँग्रेसची अंतिम यादी निश्चित झाली असून आम्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. काँग्रेसमधून आजपर्यंत अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, आता सकाळपासूनच आमच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करू नका, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

कर्जत-जामखेड विधानसभेची निवडणूक विखे यांच्या अस्तित्वाची लढाई !

जामखेड :- जिल्ह्याच्या व कर्जत-जामखेड तालुक्यातील सुपुत्राची आपल्या विकास करण्यासाठी गरज आहे, बाहेरच्या उसण्याची उधारीची गरज नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी रोहित पवार यांच्याावर नाव न घेता केली.जामखेड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, … Read more

‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तेच पर्यटनासाठी खुले करून तिथे आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे. ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी तळपायच्या त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले. दरम्यान, आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली … Read more

मधुकर पिछड यांच्या परिवाराने 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला !

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 … Read more

कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची व निवडणूक शाखेची जाेमात तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शाखेच्या वतीने प्रशिक्षण वर्ग, बारा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती व विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शासकीय बैठका … Read more