अहमदनगर :- राज्याचे जलसंधारणमंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड मध्ये अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचे समोर आले आहे.
मंत्री राम शिंदे यांचे वडिल शंकर बापू शिंदे यांनी मौजे चौंडी, रा. जामखेड, जि. अहमदनगर येथील सर्वे नं. 2/3 या जागेवर चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर शासकीय जमीनीत अतिक्रमण करुन बंगला बांधला आहे.

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी त्यांचे वडील शंकर बापू शिंदे यांच्या नावावर चौंडी येथे चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर
अनुक्रमे 15 मिटर ते 12 मिटर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचा आरोप कर्जत येथील अॅड. कैलास शंकरराव शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शेवाळे यांनी दिला आहे.
पालकमंत्री राम शिंदे यांनी अधिकार्यांवर दबाव आणून व सत्तेचा दुरुपयोग करुन सदरचे अतिक्रमण केलेले आहे. सदरच्या अतिक्रमणामुळे गावातील व इतर लोकांना सदर रस्त्याचा वापर करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पालकमंत्री राम शिंदे हे त्या इमारतीमध्ये स्वतः राहात आहेत. दोन्ही सरकारी रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरीत काढून टाकण्याबाबत तात्काळ चौकशी होऊन आदेश देण्यात यावेत.
अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात येईल, असा इशारा शेवाळे यांनी निवेदनात दिला आहे.
- कमीत कमी किती EMI वर खरेदी करता येणार ह्युंदाई क्रेटा ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 प्रॉफिटेबल बिजनेस ! एकदा सुरु झालेत की लाखोंची कमाई होणार
- बातमी कामाची ! महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, सलग इतके दिवस बँका बंद राहणार
- तुमच्या पत्नीच्या नावाने पोस्टाच्या योजनेत दरमहा 8,000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळणार 5 लाख 70 हजार 927 रुपये
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार