मोदीजी तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? खासदार सुजय विखेंच्या मुलीने पंतप्रधान मोदी यांना विचारला प्रश्न !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटलांच्या नातीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा हट्ट धरला. दोन दिवस बाबा सुजय विखेंचा पिच्छा सोडला नाही. रोज सुजय सांगायचे, “बेटा ते प्राईम मिनिस्टर आहेत.

ते कामात असतात.”पण तिचा हट्ट सुरूच. अखेर, “मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय” असा बाबांच्या ईमेलवरून थेट पंतप्रधानांना मॅसेज पाठवला… आणि आश्चर्य! थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला..

त्यात भेटण्याची वेळे नमूद होती. मोदींनी अनिषाचा हट्ट पुरवला. विखे पाटील सहकुटुंब मोदींना भेटले. मोदींनी अनिषाला चॅाकलेट दिलं, मग दोघांच्या गप्पा रंगल्या. अनिषानं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

तुम्ही इथे बसता का? हे तुमचं ॲाफीस आहे? मोदी म्हणाले, हे माझं कायमचं ॲाफीस नाही. तू आली म्हणून तुझ्या भेटीला आलो. मी तर तुझ्याशी गप्पा मारायला आलोय.

मोदी उत्तर देताहेत तोवर अनिषानं पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही गुजरातचे आहात का? मग तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? यावर मोदी यावर हसले. लगेच सुजय विखेंनी अनिषाला थांबवलं. मोदींनी ५-७ मिनिटे अनिषाशी मन मोकळेपणानं गप्पा मारल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News