खड्डे तातडीने न बुजविल्यास 15 ऑक्टाबरला येवला टोलनाका बंद पाडू

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- पावसामुळे नगर मनमाड प्रमुख राज्य महामार्गची दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने याठिकाणी अनेकदा अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत.

तेव्हा हे खड्डे तातडीने न बुजविल्यास 15 ऑक्टाबरला येवला टोलनाका बंद पाडू, असा इशारा कोपरगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला.

दरम्यान कोपरगाव तालुका हद्दीतील नगर-मनमाड महामार्गाची पावसामुळे दुरावस्था झाली. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढुन निरपराध व्यक्तींचे बळी मोठ्या प्रमाणात जात आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहेत. अनेकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली आहे.

रस्ता या टोल वसुलीची जबाबदारी नागपुरच्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. त्यांनाही अनेकवेळा निवेदने दिली पण संबंधीत अधिकारी थातुरमातुर मुरूम टाकुन खड्डे बुजवितात त्यातून अपघातांचे प्रमाण वाढते. या महामार्गावरील खड्डे पक्क्या खडीने न बुजविल्यास 15 ऑक्टोबर 2021 रोजी येवला टोलनाका बंद पाडू.

यातून होणार्‍या नुकसानीची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची राहिल, तसेच मुदतीत रस्ता दुरूस्त न झाल्यास मृत पावणार्‍या व्यक्तींची जबाबदारी संबंधित कंपनीवर ठेवून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवू, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe