अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच एखाद्या रात्री झोप लागत नाही. बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत झालेले जागरण किंवा पहाटे लवकर उठण्यामुळे असे होते. याचा अर्थ आपल्याला निद्रानाशाचा आजार जडला आहे असे नसते, तर ती अपूर्ण झोपेची लक्षणे असतात .
» झोपण्यासाठी ठरलेली निश्चित जागा : – अनेकदा आपली ठरलेली खोली आणि ठरलेली जागा असेल तरलगेच झोप लागते. रोजच्या सवयीच्या गोष्टी त्या ठिकाणी असल्या की ते सगळे वातावरण झोपेला पूरक ठरते. टीव्ही बघत बघत सोफ्यावर झोपणे, गप्पा मारत मारत दिवाणखाण्यातच पडणे यामुळे नीट झोप लागत नाही.
तुम्हाला डुलकी लागते आणि अवघडल्यासारखे झोपल्यामुळे जाग येते. अशी झोपमोड गाढ झोपेसाठी चांगली नाही. त्यामुळे टीव्ही पाहात झोपण्यापेक्षा झोपेची वेळ झाली की, आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन शांतपणे झोपणे श्रेयस्कर. तुमचा बेड, तुमच्या बेडवर तुमची जागा रोज एकच ठेवणे, ही गोष्ट अजिबात अवघड नाही.
चांगली झोप ही एक सवय असते आणि त्या सवयीची सुरुवात जागेच्या सवयीने करा. झोपेच्या खोलीत पूर्ण शांतता हवी. खोलीतील हवा खेळती असायला हवी. झोपेच्यावेळी अगदी मंद प्रकाशातील दिवा शट
» रात्रीचा आहार मर्यादित असावा : – पोटात अन्न-पाणी गेले की अन्नपचनाच्या नैसर्गिक प्रक्रिया चालू आणि य रात्रभर सलग झोपेसाठी या प्रक्रियांना काही वेळ द्यावाच लागतो. झोपे आधी किमान दोन तास जेवण करा. रात्री शक्यतो मर्यादित आहार घ्यावा. त्याचप्रमाणे पचनाच्या दृष्टीने आहार हलका असावा.
» शतपावली : – रात्रीच्या जेवणानंतर अर्धा-एक तासाने शतपावली करून यावी. शतपावलीखेरीज लिखाणाची किंवा वाचनाची सवय असेल तर त्यासाठी जेवण आधी वेळ काढा. रात्री झोपायच्या आधी शक्यतो वाचन करू नये. कारण वाचनाचा मूड लागला किंवा लेखन रंजक, आवडीचे असेल तर झोपेची वेळ टळून गेली तरी माणूस वाचत राहतो.
» औषधे आठवणीने घ्या : – झोपण्यापूर्वी तुमची नियमित औषधे घ्या. जिथे शांत झोप येईल किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला झोप येईल अशा जागेची निवड करा किंवा तशा वस्तू तुम्ही तुमच्या खोलीत सजवा. तुमची उशी खूप हलकी किंवा खूप जड असू नये. झोपण्याच्या खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या. भरपूर बा कमी पांघरूण घेऊ नका.
० झोपेची वेळ : – प्रत्येकाचे एक स्वत:चे असे बायॉलॉजिकल घड्याळ असते. आज वेळेवर झोपायचे आणि उद्या भारताची क्रिकेट मॅच असेल, तर उशिरापर्यंत जागण्यामुळे तुमचे बायॉलॉजिकल घड्याळ बिघडून जाते. झोपेची एक वेळ पाळणे ही आजच्या लाइफस्टाइलमध्ये सोपी गोष्ट नाही, पण ती अशक्यही नाही. वेळेचा काहीतरी सुवर्णमध्य गाठणे नक्कीच शक्य आहे. रात्री अकरा ही त्या दृष्टीने योग्य वेळ आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम