अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- १ जानेवारी २०२२ रोजी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला २०३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्त दलित समाजातील लोक एकत्र जमले असताना कार्यक्रमात दंगल उसळली आणि ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.(Bhima-Koregaon)
त्यामुळे भीमा-कोरेगावकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. मात्र भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास नेमका काय? या दिवशी शौर्य दिन का साजरा केला जातो?याविषयी आज आपण जाणून घेऊया नेमका काय आहे इतिहास?
जाणून घ्या इतिहासकारांचे मत १ जानेवारी १८१८ साली पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं भीमा नदीच्या काठावर दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये तुंबळ युद्ध झालं.इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत ५०० सर्व जातीय सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला हरवलं.
या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला. लढाईत इंग्रजांच्या २७५ सैनिकांचा मृत्यू झाला. तर पेशव्यांचे ६०० च्या आसपास सैनिक मृत्यूमुखी पडले, असे दाखले अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून देण्यात आलेत.
या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभ उभारला. त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला भेट दिली होती.
२०१० पासून मोबाईल क्रांतीनंतर हा इतिहास सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि इथली गर्दी वाढू लागली, असं सांगितलं जातं.
भीमा-कोरेगावची लढाई म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले पहिले बंड होते आणि त्याच लढाईत महार समाजाला यश मिळाले. म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाची आठवण म्हणून अजूनही आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला भेट देतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम