Lifestyle of Russian President Vladimir Putin :- सध्या संपूर्ण जगात जर कोणते नाव चर्चेत असेल तर ते फक्त एकच नाव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन. यामागचे कारण कोणालाही सांगण्याची गरज नाही.
कारण व्लादिमीर पुतिन यांनी सध्या युक्रेनवर हल्ला केला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पुतीनचे सैन्य पुढे गेले असून, सध्या ते युक्रेनची राजधानी कीवच्या दारात उभे आहे.

युद्ध असच सुरू राहिले तर आगामी काळात व्लादिमीर पुतिन युक्रेनला गुडघे टेकण्यास भाग पाडतील. रशियन सैन्य जरी हे युद्ध लढत असले, तरी त्यामागे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच डोकं आहे.
त्यांची कडक शिस्त, त्यांची आलिशान जीवनशैली आणि त्यांच्या इतर काही गोष्टी पुतीन यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे करतात हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित नाही, तर आज आम्ही तुम्हाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जीवनशैलीबद्दल सांगत आहोत.
त्यांची सकाळची सुरुवात अशी होते – अनेक बड्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात, तर पुतिन सकाळी उशिरा उठतात. व्लादिमीर पुतिन यांचा नास्ता दुपारी होतो. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते संध्याकाळी कामाला सुरुवात करतात. म्हणजे त्यांना रात्री काम करायला आवडते.
फिटनेसची विशेष काळजी – पुतीन यांच्या फिटनेसबद्दल बोलायचे झाले, तर ते त्याची विशेष काळजी घेतात. सध्या ते 69 वर्षांचे असून, ते अजूनही पूर्णपणे फिट दिसत आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते रोज जिममध्ये जातात. याशिवाय पुतिन हे एक चांगले जलतरणपटू देखील आहेत आणि ते दिवसातून सुमारे 2 तास पोहतात.
त्यांच्याकडे जवळपास 50 विमाने – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विमाने उडवण्याची आवड आहे, ज्यासाठी त्यांच्याकडे 50 विमाने आहेत. काही वर्षांपूर्वी रशियाच्या जंगलात भीषण आग लागली होती, तेव्हा पुतिन यांनी स्वतः विमान उडवून तिथल्या लोकांना वाचवले होते. याशिवाय त्यांनी रेसिंग कार आणि पाणबुड्याही चालवल्या आहेत.
शस्त्राची आवड – एकीकडे पुतिन यांना मैदानी खेळ खेळायला आवडतात, ज्यात आइस हॉकीचा समावेश आहे. तर दुसरीकडे त्यांना शस्त्रांचाही खूप आवड आहे. तसेच जेव्हा जेव्हा देशासाठी कोणतीही नवीन शस्त्रे येतात तेव्हा पुतिन स्वतः ती वापरतात आणि पाहतात.
ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट – तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, व्लादिमीर पुतिन हे ज्युडोमधील ब्लॅक बेल्ट मास्टर आहेत. याशिवाय पुतिन यांना शिकार करायला आवडते आणि ते उत्तम शिकारीही आहेत. ते रोज जंगलात शिकारीला जातात.
वैयक्तिक जीवन ठेवतात गुप्त – जर आपण व्लादिमीर पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर ते अगदी गुप्त ठेवतात. पण त्यांची छायाचित्रे आणि गोष्टी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये येत राहतात. 1993 मध्ये, त्यांनी व्यवसायाने फ्लाइट अटेंडंट असलेल्या ल्युडमिला श्रेबेनेवाशी लग्न केले. मात्र, 31 वर्षांचे हे लग्न 2014 मध्ये तुटले.
20 आलिशान घरे – 2012 पर्यंत पुतिन यांच्याकडे 20 आलिशान घरे होती. ही आलिशान घरे मॉस्को, फिनलंड आणि इतर अनेक ठिकाणी होती. त्यावेळी पुतीन दक्षिण-पूर्व युरोपच्या काळ्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या आपल्या आलिशान घरामुळे चर्चेत होते. त्याची किंमत त्यावेळी $950 दशलक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.