चंद्रशेखर बावनकुळेंचा आघाडी सरकारला इशारा, म्हणाले, …तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

Ahmednagarlive24 office
Published:

नागपूर : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई सायबर पोलिसांनी २ तास चौकशी करत जबाब नोंदवला आहे. त्यानंतर राज्यातील भाजप कार्यकर्त्ये आणि नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule’s) देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवास्थानी १२ ते २ दरम्यान २ तास चौकशी केली आहे. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेत गंभीर आरोप देखील केले आहेत.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला थेट इशाराच दिला आहे. ते म्हणले, महाविकास आघाडीचा भ्रष्टाचारी चेहरा आम्ही जनतेसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही.

आज मा. @Dev_Fadnavis जी यांना समर्थन देण्यासाठी व्हेरायटी चौकात आम्ही पोलिसांच्या नोटिसीची होळी पेटवली. असे ट्विट बावनकुळेंनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली.

हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा गंभीर इशारा त्यांनी आघाडी सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी.

नोटीस पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू. असेही बावनकुळे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe