बुलढाणा : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) चौकशी केली त्यानंतर राज्यातले भाजपचे कार्यकर्त्ये आणि नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून २ तास चौकशी करण्यात आली आहे. १२ ते २ या वेळेत पोलिसांनी चौकशी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल २ तास जबाब नोंदवण्यात आला आहे.
एसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या सरकारी बंगल्याच्या बाहेर गर्दी देखील केली होती.
देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केल्यानंतर राज्यातले भाजप कार्यकर्त्ये चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार आकाश फुंडकर (Akash Phundakar) यांनीही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला दिला आहे.
बुलढाण्यात आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांना हात लावला, तर जशी नोटीस जाळण्यात आली, तसेच महाविकास आघाडी सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा फुंडकर यांनी दिला आहे.