Soil Testing: माती परीक्षण म्हणजेच उत्पादनात वाढ; जाणुन घ्या कसं करणार माती परीक्षण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- शेती करण्यासाठी शेतात चांगली माती आणि पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्या जमिनीत उत्पादन सहज आणि अधिक घेता येऊ शकत.

त्यामुळे कृषी तज्ञ नेहमीच शेतकरी बांधवांना (Farmers) माती परीक्षण करण्याचा सल्ला देत असतात. माती परिक्षण (Soil Testing) केल्यामुळे पिकाला आवश्यक मुलद्रव्याची गरज आपल्या लक्षात येते, यामुळे जमिनीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे

ते लक्षात येते आणि त्या अनुषंगाने खतांची मात्रा ठरवण्यास शेतकरी बांधवांना मदत होते यामुळे उत्पादन खर्चात बचत होते शिवाय खतांचा अतिरेक वापर (Excessive use of fertilizers) टाळता येतो आणि सहाजिकच त्यामुळे उत्पादनात मोठी भरीव वाढ होते.

माती परिक्षणाचे हेच फायदे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीची चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, माती परीक्षण करण्यासाठी शासनाकडून (Government) शेतकऱ्यांना मदत केली जाते.

यासाठी सरकारने पंतप्रधान मृदा आरोग्य कार्ड योजना (Prime Minister Soil Health Card Scheme) देखील सुरू केली आहे.

माती परीक्षण करण्यासाठी नमुना घेण्याची पद्धत

•शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, माती परीक्षण करण्यासाठी पीक पेरणी आणि लागवडीच्या एक महिना आधी मातीचे नमुने घेणे अपेक्षित असते. मातीचे नमुने घेण्यासाठी आपण आपल्या शेतातील 8 ते 10 वेगवेगळ्या ठिकाणे निवडा लक्षात राहावे यासाठी त्यांना चिन्हांकित करा. ज्या ठिकाणी आपण चिन्हे लावली आहेत तेथे सुमारे 15 सेमी खोल खड्डा खोदा आणि नंतर फावड्याच्या साहाय्याने बोटाची जाडीइतका मातीचा नमुना घ्या.

•माती परिक्षण साठी नमुना म्हणुन घेतलेली माती बादलीत किंवा कोणत्याही एका भांड्यात गोळा करा. त्याचप्रमाणे इतर ठिकाणच्या मातीचे नमुनेही घ्यावेत.

•सर्व आठ ते दहा ठिकाणचे नमुने घेतल्यानंतर सर्व माती नीट मिसळा आणि त्यातून फक्त 500 ग्रॅम माती सोबत ठेवा आणि उरलेली माती फेकून द्या.

•ही 500 ग्राम माती आता स्वच्छ पिशवीत ठेवा.

•स्वच्छ पिशवीत ठेवलेली 500 ग्रॅम माती परीक्षणासाठी स्थानिक कृषी पर्यवेक्षक किंवा जवळच्या कृषी विभागाकडे पाठवावी लागणार आहे. माती परीक्षणासाठी आपण मातीचा नमुना आपल्या जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेतही पाठवू शकता. त्या ठिकाणी तुमच्या मातीच्या नमुन्या सोबत तुमच नाव आणि तुमचा पत्ता लिहलेला असतो. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, या सर्व ठिकाणी माती परीक्षण मोफत केले जाते.

मातीचा नमुना घेताना काय काळजी घेणार

•माती परीक्षणासाठी शेताच्या अधिक खालच्या भागाची माती कधीही घेऊ नका. बांधवरची माती देखील माती परीक्षणासाठी वापरू नये.

•पाणी असलेल्या जागेतून तसेच कंपोस्ट असलेल्या ठिकाणाहून माती घेऊ नका.

•झाडाच्या जागेवरूनही माती परीक्षणासाठी माती घेऊ नये.

•चाचणीसाठी घेतलेली माती कधीही पिशवीत किंवा गोणीत ठेवू नका. चाचणी साठी घेतलेली माती नेहमी एका स्वच्छ पॉलिथिन बॅगमध्ये ठेवावे.

•शेतात उभी पिके असतील तर अशा ठिकाणाहूनही माती शिक्षणासाठी आवश्यक मातीचा नमुना घेऊ नका.

•शेतात ज्या ठिकाणी खताचा वापर केला गेला असेल अशा ठिकाणची माती देखील घेऊ नका.मातीचा नमुना घेताना काय काळजी घेणार

•माती परीक्षणासाठी शेताच्या अधिक खालच्या भागाची माती कधीही घेऊ नका. बांधवरची माती देखील माती परीक्षणासाठी वापरू नये.

•पाणी असलेल्या जागेतून तसेच कंपोस्ट असलेल्या ठिकाणाहून माती घेऊ नका.

•झाडाच्या जागेवरूनही माती परीक्षणासाठी माती घेऊ नये.

•चाचणीसाठी घेतलेली माती कधीही पिशवीत किंवा गोणीत ठेवू नका. चाचणी साठी घेतलेली माती नेहमी एका स्वच्छ पॉलिथिन बॅगमध्ये ठेवावे.

•शेतात उभी पिके असतील तर अशा ठिकाणाहूनही माती शिक्षणासाठी आवश्यक मातीचा नमुना घेऊ नका.

•शेतात ज्या ठिकाणी खताचा वापर केला गेला असेल अशा ठिकाणची माती देखील घेऊ नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe