मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) लोडशेडिंग (Load shedding) आणि वीज संकटावर तीव्र नाराजी व्यक्त करत ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून सरकारला (Government) जाब विचारला आहे.
साक्षी धोनीचे ट्विट

“झारखंडमधील एक करदाता या नात्यानं एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? वीजेची बचत यासाठी आम्ही तर जबाबदारीनं वागत आहोत”, असे ट्विट साक्षी धोनीने केले आहे.
As a tax payer of Jharkhand just want to know why is there a power crisis in Jharkhand since so many years ? We are doing our part by consciously making sure we save energy !
— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) April 25, 2022
झारखंडमध्ये (Jharkhand) सध्या भरदिवसा लोडशेडिंगच्या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात वीजेची मागणी तब्बल २५०० मेगावॅटहून अधिक झाली आहे.
यासाठी पूर्ण जबाबदारी टीव्हीएनएलच्या (TVNL) दोन युनिटवर येऊन ठेपली आहे. ज्यातून जवळपास ३५० मेगावॅट वीजेच उत्पादन होत आहे. २३ एप्रिल रोजी अत्याधुनिक पावर युनिटमध्ये वीजेच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने मोठे वीज संकट निर्माण झाले आहे.
https://twitter.com/SaakshiSRawat/status/1174641094916595712?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1174641094916595712%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fforyou%3Flaunch%3Dtruemode%3Dpwa
याबाबत साक्षी धोनीने वीज संकटाचा मुद्दा उपस्थित केला आहे. साक्षी धोनीनं २०१९ मध्येही वीज संकटावर रोखठोक भाष्य केले होते. “रांचीच्या जनतेला जवळपास दररोज लोडशेडिंगच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. दररोज चार ते सात तास बत्ती गुल असते.
आज १९ सप्टेंबर २०१९ रोजी गेल्या पाच तासांपासून रांचीमध्ये वीज नाही. लोडशेडिंगचं कारण समजत नाही. कारण आता वातावरणही चांगलं आहे. आज कोणता सणही नाही. मला आशा आहे की या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांकडून तोडगा काढला जाईल”, असं ट्विट साक्षीने याआधीही केले होते.
दरम्यान, राज्यातील जनता सातत्यानं होणाऱ्या लोडशेडिंगला कंटाळली आहे. कारण राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही अधिक आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे पश्चिम सिंहभूम, कोडरमा आणि गिरीडीह जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळतो आहे. तर २८ एप्रिलपर्यंत रांची, बोकारो, पूर्वी सिंहभूम, गढवा, पलामू आणि चतरामध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.