अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Formal success story : आपला देश कृषिप्रधान देश (Agricultural country) म्हणुन विख्यात आहे कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे.
देशातील बहुतांशी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती क्षेत्र आहे. छत्तीसगड राज्याच्या (Chhattisgarh) रायगड जिल्ह्यातील सारंगढ तहसील मधील मौजे माणिकपूर गावात राहणारे खीरसागर पटेल यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन देखील शेतीचं आहे.
मात्र भारतीय शेती (Indian Farming) ही सर्वस्वी पावसावर आधारित आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) पारंपरिक शेती (Traditional Crop) करून आपला उदरनिर्वाह भागवतात.
पूर्वी खीरसागर देखील पावसावर आधारित पारंपरिक पिकांची लागवड करत यामुळे त्यांच्या केवळ 11 सदस्यांच्या संयुक्त कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होता.
यामुळे त्यांनी शेती क्षेत्रात जरा हटके विचार केला आणि शेती मध्ये काहीतरी नवीन करण्याचा मनोमणी निश्चय केला या अनुषंगाने त्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास केला. शासनाच्या योजनेचा लाभ घेत त्यांनी ठिबक सिंचन प्रणाली साठी अनुदान प्राप्त केले.
यामुळे त्यांचा मोठा फायदा झाला आणि रब्बी हंगामात पाण्याचा कमी वापर करत गहू, कडधान्ये, तेलबिया इत्यादी रब्बी पिकांचे मुबलक उत्पादन घेतले.
यामुळे त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली. याशिवाय त्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत मिश्रपीक पद्धतीचा अवलंब केला. मिश्र शेती व जोडीला पशुपालनाची सांगड घालत त्यांनी चांगले उत्पन्न प्राप्त करायला सुरुवात केली.
ते आपल्या शेतात भाजीपाला वर्गीय पिकांची मिश्र शेती करत आहेत, यामुळे शेतीतून सुमारे साडेचार लाख तर दूध विक्रीतून 60 ते 70 हजार अतिरिक्त निव्वळ उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे.
खीरसागर यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करत पिकांसाठी शेणखताचा वापर केला. खीरसागर यांनी पीकपद्धतीत बदल करत तेलबिया आणि कडधान्ये पिकांना प्राधान्य दिले आणि उन्हाळी धानाच्या जागी त्यांनी भुईमूग, मोहरी, सूर्यफूल, उडीद, मूग, हरभरा इत्यादी पिकांची लागवड केली.
त्यामुळे कमी पाणी आणि कमी खर्चात अतिरिक्त उत्पन्न त्यांना मिळतं आहे. खीरसागर यांनी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण योजनेंतर्गत रोटाव्हेटर अनुदान मिळवले, याचा उपयोग श्री. पटेल यांना पूर्व मशागतीसाठी होतं आहे यामुळे शेती क्षेत्रातील कार्य अधिक जलद गतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खीरसागर यांनी बागायती पिकांचे क्षेत्र वाढवत प्रामुख्याने भेंडी, कारली, बटाटा, कांदा, कोबी आदी भाज्यांची लागवड केली शिवाय गावातील सर्व शेतकऱ्यांचा भाजीपाला गोळा करून थेट मार्केटिंगसाठी बाजारात नेण्यास सुरुवात केली.
अशा प्रकारे त्यांना भाजीपाला वर्गीय पिकातून त्यांना एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खीरसागर यांना पशुपालन व्यवसायातून शेण आणि गोमूत्र मिळते यांचा वापर करत त्यांनी आपल्या गोबर गॅस प्लांट विकसित केला आणि त्यातून मिळणारे इंधन अन्न तयार करण्यासाठी वापरले.
एवढेच नाही बायोगॅस स्लरी कंपोस्ट म्हणून वापरली. कडुनिंब, करंज, धतुरा इत्यादी पाने गोमूत्रात मिसळून कीटकनाशक बनविण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
एकंदरीत त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत चांगले उत्पादन प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे. शेती व्यवसायात खीरसागर यांनी केलेल्या अमुलाग्र बदलामुळे शेतीवरील खर्च 12 टक्क्यांनी कमी झाला असून अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.
मानवी आरोग्य अबाधित राहावे म्हणुन घराच्या छतावर सेंद्रिय शेतीला चालना देत त्यांनी टोमॅटो, मिरची, कारले, वांगी या पिकांची लागवड सुरू केली.
त्यामुळे सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून चांगले उत्पादन घेतले. याशिवाय त्यांनी भेंडीचे देखील उत्पादन घेतले.
भेंडीचे उत्पादन प्राप्त केल्यानंतर शेष राहिलेल्या भेंडीच्या रोपापासून त्यांना हिरवळीचे खत प्राप्त झाले. खीरसागर यांनी शेतीशी निगडीत सर्व नवनवीन तंत्रे अवलंबली आहेत आणि ते शेतीक्षेत्रात असाच नाविन्यपूर्ण प्रयोग सर्व ग्रामस्थांना देखील अवलंबण्याची प्रेरणा देतात.
या सर्व तांत्रिक आणि प्रेरणादायी कार्यामुळे 2019-20 मध्ये डॉ. खुबचंद बघेल पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यामुळे आजच्या घडीला त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, एक बोलेरो आहे आणि ते आपल्या कुटुंबातील मुलांना चांगल्या शिक्षणासाठी शहरांमध्ये शिकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, आज त्यांचे कुटुंब अगदी आनंदी आहे.