Maharashtra news:पुणे रेल्वे स्थानकावर आढळून आलेली संशयास्पद वस्तू बॉम्ब नव्हे, तर फटाका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याची कसून तपासणी करण्यात आली असून काळजीची गरज नाही, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ डिएफसी उदयसिंग पवार यांनी दिली.
दरम्यान, आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याची माहिती मिळाल्याने संपूर्ण पुणे रेल्वे स्थानक रिकामं करण्यात आले होते.
संशयास्पद वस्तू जिलेटीनच्या कांड्या असल्याचा संशय व्यक्त होत होता. खबरदारी म्हणून स्थानकावरील रेल्वे वाहतूकही थांबविण्यात आली होती.
बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ आयुक्त घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी केल्यानंतर बॉम्ब नसल्याचे उघड झाले.