“सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही, आम्ही पाहून घेऊ”

Published on -

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमागे ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) धाडी सुरु आहेत. आता यामध्ये महाविकास आघाडीचे नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर लागला आहे. अनिल परब यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.

अनिल परब यांच्या संबंधीत महाराष्ट्रातील ७ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असे सांगत होते. त्यानंतर आज ईडीकडून अनिल परब यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

या छापेमारीवरून शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, तसेच ते कडवट शिवसैनिक देखील आहेत.

सध्याची जी कारवाई सुरू आहे, ती राजकीय सूडबुद्धीनं सुरु आहे. ज्याप्रकारचे आरोप ईडीकडून लावले जात आहेत, त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हा भाजपच्या लोकांवर आहेत.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. तसेच अशा कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय असा राऊतांनी हल्लाबोल केला.

महाराष्ट्राच्या राजकारणाला इतकं वाईट वळण कधीच मिळालं नव्हतं. सबळ पुरावे असणाऱ्यांनी जीतू नवलानीला कुणी पळवलं, याचंही उत्तर द्यावं असा सवाल त्यांनी भाजपाला केला.

सरकारला त्रास देण्यासाठीच या कारवाया सुरु आहेत. फक्त शिवसेनाला त्रास द्यायचा आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी कारवाया करायच्या, असे प्रयत्न सुरु आहेत.

मी केलेल्या आरोपांवर आणि दाखल केलेल्या तक्रारींवर अद्याप उत्तर येत नाही. ईडीकडे आम्ही अनेक प्रकरणं पाठवली आहेत. पण ती फाईल उघण्याची तसदीही कुणी घेत नाही. आम्ही पाहून घेऊ” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe