“कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, हे सगळे फडतूस लोक”

Published on -

पुणे : राज्यात मध्यंतरी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चाळीस मातोश्री वर म्हणण्याचा जो ड्रम केला होता त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नवनीत राणा यांच्यावर शिवसेना (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी खोचक टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, नवनीत राणा (Navneet Rana) या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात आणि सध्या त्या तेच करत आहेत. आपण काय आहोत याचा विचार त्यांनी केला पाहिजे.

हे असले सगळे फडतूस लोक आहेत, त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे असे दिसत आहे, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांचा खोचक समाचार घेतला आहे. पुण्यात बोलताना त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात.

आपण कोण आहोत, काय आहोत याचा विचार न करता कोणीही फडतूस माणसे अशाप्रकारचे विचार मांडत असतील, तर त्याचा विचार करायला हवा. त्या खासदार आहेत.

जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा सोडून अशाप्रकारची बेफाम वक्तव्ये करू शकतात, त्या अभिनेत्री आहेत. त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणांवर केली.

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकदा तरी हनुमान चालिसा वाचून दाखवावी. उद्धव ठाकरे महाराष्ट्रावरचे शनि आहेत, अशी वक्तव्ये राणांनी केली होती, त्यावर गोऱ्हे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमचा अंदाज चुकला तर हुतात्मा चौकात येवून दिलगिरी व्यक्त केरेल. मात्र मी आव्हान देते की जे बोलतायत त्यांनी त्यादिवशी येवून दिलगिरी तर व्यक्त करावीच, मात्र सहा महिने लोकांची दिशाभूल केल्याबद्दल उठाबशाही काढाव्यात, असे आव्हान नीलम गोऱ्हे यांनी भाजपाला दिले आहे.

तर राज ठाकरे हे वैफल्यग्रस्त आहेत. त्यामुळे सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करतात. कारण त्यामुळे त्यांचे महत्त्व वाढते आणि सुरक्षाही मिळते, असा टोला गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

18 खासदार आणि जवळपास 63 आमदार हे जनतेच्या प्रेमामुळे मिळाले आहेत. त्यांच्या हाती मात्र काहीही नाही, त्यामुळे त्यांना वैफल्य आल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!