Maharashtra News:शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार, खासदार, पदाधिकारी पुढे येत आहेत.
अर्थात ते सगळे आधीपासूनच राजकारणात आहेत. मात्र, एका राजकारणाबाहेरील व्यक्तीने ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षक दीपक पोपट खरात यांनी मात्र ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

२७ जुलै २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत “शिवसेना” या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात फेब्रुवारी २००२ पासून सेवेत आहेत. सुमारे २० वर्षे नोकरी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचे हे राजीनामा पत्र सध्या व्हायरल होत आहे.













