शिवसेनेतून बंडखोरी करताना शिंदे गटाने बहुतांश हालचाली रात्रीतून केल्या. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसासोबतच रात्रीही कार्यरत आहेत.
महत्वाचे दौरे आणि निर्णयही रात्रीच होत आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून संभाव्य नावे पुढे येत आहेत.

शिंदे गटाने मात्र यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आज रात्री अकरा वाजता बैठक बोलाविल्याची माहिती आहे. रात्री होणाऱ्या बैठकीत यासंबंधीचे महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
भाजपकडे मात्र आज सकाळापासूनच बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. आता रात्री शिंदे गटाचे आमदार आणि नेते यांची बैठक होणार आहे.