Important news : आपण सुसंस्कृत समाजात (civilized society) राहतो आणि येथे राहण्याचे काही नियम (rules) आहेत.
तुम्ही कोणत्याही सोसायटीमध्ये (society) राहत असेल तर तिथे काही नियम बनवलेले असते आणि काही नियम असे असतात की त्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल.

मागच्या काही दिवसापूर्वी नोएडाच्या (Noida) एका सोसायटीत एका महिलेने सुरक्षा रक्षकाशी (security guard) ज्या प्रकारे गैरवर्तन केले ते सर्वांनी पाहिले.
न्यायालयाने या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशा परिस्थितीत, लोक जिथे राहतात तिथे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा एक चूक तुरुंगाची हवा खायला लावू शकते. चला तर मग जाणून घेऊया सोसायटी राहणाऱ्या लोकांनी कोणत्या चुका करू नयेत.

या 4 चुका करू नका
शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
तुम्ही जिथे राहता, तुमच्यामुळे तुमच्या शेजाऱ्यांना दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही पार्टी करता, आवाज काढता किंवा तुमच्या शेजाऱ्यांना किंवा इतर कोणाला त्रास देणारी कोणतीही चुकीची कृतीकरत असेल तर अशा परिस्थितीत तुमच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते.
कोणाशीही गैरवर्तन करू नका
तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये कोणाशीही गैरवर्तन करण्याची गरज नाही किंवा कोणाशीही चुकीचे वागण्याची आवश्यकता नाही. स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, घरात काम करणाऱ्या मोलकरीण इत्यादी लोकांशी गैरवर्तन करू नका. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्याचे शोषण किंवा गैरवर्तन केले आणि पोलिसांकडे तक्रार गेली तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

नियम पाळा
तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या सोसायटीचे नियम पाळले पाहिजेत. रात्री उशिरा पार्टी करणे, रात्री उशिरा आवाज करणे, चुकीची कामे न करणे असे अनेक नियम जवळपास प्रत्येक सोसायटी आहेत. जर तुम्ही हे नियम मोडत असतील तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टींचे पालन केले पाहिजे.

त्रास देऊ नका
सोसायटीमध्ये राहताना तुमच्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी असल्यास ते कोणालाही चावू शकतो किंवा त्रास देऊ शकतो जर असं झालेतर तुमच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकते.













