e-Aadhaar Download : सध्या प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. परंतु, अनेकदा काही जणांचे आधार कार्ड हरवते किंवा चोरीला जाते. अशावेळी त्यांच्याकडे दुसरा पर्याय असतो तो म्हणजे ई-आधार.
सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे तुम्ही आता ई-आधार हे आधार क्रमांक नसतानाही डाउनलोड करू शकता. अनेकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते.

असे आहेत फायदे
- ई-आधार हरवण्याची, चोरीला जात नाही
- तुम्ही ते मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ठेवू शकता
- तसेच ते कुठेही नेऊ शकता.
असे कर डाउनलोड
स्टेप 1
- तुम्ही आता सोप्या स्टेपमध्ये आधार कार्ड क्रमांकाशिवाय ई-आधार डाउनलोड करू शकता.
- यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.
स्टेप 2
- त्यानंतर तुम्हाला भाषा निवडावी लागणार आहे.
- डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला login चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 3
- तेथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही तो तुमच्या 28 अंकी नावनोंदणी आयडीने बदलू शकता.
- त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
स्टेप 4
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल
- ते येथे प्रविष्ट करा
- त्यांतर तुम्हाला तुमचे ई-आधार डाउनलोड करता येईल.