Food that increase uric acid in body : अनेक जणांच्या रक्तात यूरिक अॅसिड वाढते. त्यामुळे त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. सध्याच्या काळात हा आजार खूप सामान्य झाला आहे. असे जरी असले तरी त्याचा शरीरावर परिणाम खूप मोठा होतो. यालाच हायपरयुरिसेमिया असेही म्हणतात.
जास्त प्रमाणात अन्न खाणे, जास्त वजन असणे, मधुमेह, विशिष्ट लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ घेणे किंवा जास्त मद्यपान केल्यामुळे असा त्रास होतो. तसेच युरिक अॅसिडची मात्रा वाढली तर अनेक आजारांचा धोका वाढत जातो. त्यामुळे युरिक अॅसिड वाढवणारे पदार्थ खाऊ नका.
1. आर्बी
आर्बीमध्ये प्युरीन आणि कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे यूरिक ऍसिड वाढते. जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर तुमची किडनी खराब होण्याची शक्यता जास्त असते.
2. उडीद आणि मसुरीची डाळ
मसूर आणि उडदाच्या डाळीतही प्युरीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेही तुमची किडनी खराब होते.
3. मासे
माशांमध्ये मोठ्या प्रमाणात युरिक अॅसिड असल्यामुळे मासे खाणे टाळावे. नाहीतर तुमची किडनी निकामी होऊ शकते.
4, गोड पेय आणि अल्कोहोल
अल्कोहोल आणि गोड पेयाच्या जास्त सेवनामुळे तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या गंभीर आजार होतात. त्यामुळे या गोष्टींपासून लांब रहा.