Heart Attack Misconceptions : तुम्हीही हृदयाशी निगडित या 5 चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवत नाही ना? वेळीच सावध व्हा नाहीतर जाऊ शकतो जीव

Ahmednagarlive24 office
Published:

Heart Attack Misconceptions : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात हृदयविकाराचा झटका ही एक सामान्य समस्या बनली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे आता केवळ वृद्ध किंवा आजारीच नाही तर तरुणांचाही मृत्यू होत आहे. हृदयविकाराची अनेक कारणे आहेत.

यामध्ये दररोज खाण्यात येणाऱ्या काही गोष्टीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. परंतु, अनेकजण हृदयविकाराशी निगडित चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात. जर तुम्हीही असा विश्वास ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचाही चुकीच्या माहितीमुळे जीव जाऊ शकतो.

हे आहेत चुकीचे गैरसमज

मधुमेहावरील औषधापासून हृदयाचे संरक्षण

मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका या समस्या जरी एकमेकांशी निगडित असल्या तरी या दोन्ही वेगवेगळ्या समस्या आहेत. मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढत जातो. असे असूनही, मधुमेहावरील औषधाचा वापर हृदयविकारापासून संरक्षण देत नाही. त्यासाठी तुम्हाला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावी लागतील.

किरकोळ हृदयविकाराचा झटका नसतो जीवघेणा

अनेकांना असे वाटते की किरकोळ हृदयविकाराचा झटका जीवघेणा नसतो. परंतु, असा समज खूप घातक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांकडून ताबडतोब उपचार घ्यावेत.

केवळ छातीत दुखणे हे लक्षण

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीत तीव्र वेदना होऊन श्वास गुदमरतो. परंतु हे लक्षात ठेवा की ही लक्षणे नेहमी दिसतातच असे नाही. कधीकधी छातीत वेदना होत नाहीत, मात्र मानेत किंवा जबड्यात पेटके सुरू होतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहा.

वयाच्या 40 वर्षानंतरच चाचणी योग्य

अनेकांचे असे मत आहे की हृदयविकाराचा धोका 40 वर्षांनंतरच सुरू होतो. त्यामुळे 40 वर्षानंतरच चाचणी करावी. ही चुकीची विचारसरणी असून अभ्यासानुसार, आजच्या युगात वयाच्या 20 व्या वर्षापासून कोलेस्टेरॉलची तपासणी सुरू केली करावी, जर शरीरात कोलेस्टेरॉल वाढत आहे असे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन उपचार सुरू करा.

होतात उकडलेल्या अन्नाचे फायदे

जेव्हा एखाद्याला हृदयाचा त्रास होतो तेव्हा अनेकजण त्यांना उकडलेले अन्न खाण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या मतानुसार, हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यानंतर तळलेल्या वस्तू देऊच नये शिवाय उकडलेले अन्न देखील देऊ नये. त्यामुळे शरीरात इतर समस्या सुरू होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe