Kangana Ranaut : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावर आणि ठाकरे गट यांच्यात मोठा वाद झाला होता. कंगनाचे मुंबईतील घर देखील महानगरपालिकेकडून पाडण्यात आले होते. यामुळे ठाकरे आणि कंगना रणावत यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झाली. तसेच या नंतर केंद्र सरकारने तिला संरक्षण देखील वाढवले होते.
असे असताना काल उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना नाव आणि चिन्ह देखील गेले. यामुळे कंगना रणावतने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. कंगनाने टि्वट करीत निवडणूक आयोगाचे निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते.

हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडले, त्यावेळीच मला वाटल होत की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही, असे ट्विट कंगनाने केले आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद तेव्हा पेटला होता. याची सुरुवात कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. कंगनाने शिवसेनेला तालिबान आणि बाबराची सेना असे म्हटले होते.
तसेच कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यावर कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, आज माझ घर पाडले आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते. यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.