Post Office : अनेकांचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरु करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्याही व्यक्तीला खाते सुरु करता येते. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली तर यात कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच परतावाही जबरदस्त असतो.
त्यामुळे अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. अनेकजण खात्यातील शिल्लक चेक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जातात. परंतु, तुम्ही आता ते घरी बसून सहज तपासू शकता. जर तुम्हालाही घरबसल्या सोपी पद्धत जाणून घ्यायची असेल तर बातमी नीट वाचा.

वापरा हे मार्ग
क्रमांक 1
- तुम्हाला प्ले स्टोअरवरून आयपीपीबी अॅप डाउनलोड करून त्यात बँक खाते क्रमांक, ग्राहक आयडी, जन्मतारीख आणि नोंदणीकृत
- मोबाइल क्रमांक भरावा लागणार आहे.
- त्यानंतर आता मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकून अॅपवर लॉगिन करू शकता.
- नंतर MPIN सेट करून तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता.
क्रमांक 2
- SMS द्वारे तुम्ही शिल्लक तपासू शकता.त्यासाठी “REGISTER” टाइप करून तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 7738062873 वर पाठवा.
- तुमचा नंबर एसएमएस सुविधेसाठी नोंदणीकृत होईल
- त्यानंतर तुम्हाला “balance” टाइप करून आता हा मेसेज 7738062873 वर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची शिल्लक तपासू शकता.
- तसेच तुम्हाला मिनी स्टेटमेंट मिळवायचे असेल तर, तुम्हाला “mini” टाइप करून 7738062873 वर पाठवावे लागेल.
क्रमांक 3
- इतकेच नाही तर तुम्ही मिस्ड कॉल बँकिंग सेवेद्वारे शिल्लक जाणून घेऊ शकता, ज्यात तुम्हाला प्रथम मिस्ड कॉल बँकिंग सेवेसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
- तसेच तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8424054994 डायल करावा लागणार आहे.
- त्यानंतर नंबर नोंदणीकृत झाला की, तुम्ही 8424054994 वर मिस कॉल देऊन शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट घेऊ शकता.
क्रमांक 4
- यात तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून टोल फ्री क्रमांक 155299 वर कॉल करावा लागणार आहे.
- त्यानंतर IVR वर तुमची पसंतीची भाषा निवडून तुमच्या खात्याची माहिती टाकावी लागणार आहे.
- यानंतर, तुम्हाला गेट बॅलन्स पर्याय निवडून तुम्ही तुमची शिल्लक जाणून घेऊ शकाल.